क-हाकाठचे साहित्यरत्न
महात्मा जोतिबा फुले
लेखक -दशरथ यादव, पुणे
----------------------
महात्मा फुले (इ.स.१८२७ - नोव्हेंबर २८ १८९०) हे मराठी, भारतीय समाजाचे आधुनिक समाजसुधारक होते.
त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे जमिनीचा सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. सासवडपासून सात किलोमीटर अंतरावरील खानवडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे तेथे घर होते. जमिन होती. अजूनही त्यांच्या नावाने सातबारा तिथे पाहायला मिळतो.
तुकारामांचा प्रभाव
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सामाजिक प्रबोधनासाठी तुकारामांनी अंभग रजना केली त्याच अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पिढ्या न पिढ्या पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली शिवजंयती महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन साजरी केली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधिचा शोध त्यांनी लावला. समाधीची पूजा केली..रयतेचे राज्य उभे करणा-या शिवाजीराजांवर त्यांनी कुळवाडीभूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिला. सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात समाजात जागृती करण्याचा चंग बांधून त्यांनी समाजाच्या हातातील मनुस्मृतीची बेडी तोडण्यासाठी मोठे कष्ट घेतले. प्रारंभी समाजातील लोकांनीच त्यांना अज्ञानातून विरोध केला. पुण्यातील ब्रम्हणांकडून जोतीरावांचा खूप छळ झाला. पण ते डगमगले नाहीत.
मुलींची पहिली शाळा
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा येथे झाला. इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह झाला. इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना केली. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी, रात्रशाळा, मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न, विधवाविवाहास साहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप, गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला, हौद अस्पृश्यांसाठी खुला, सत्यशोधक समाजची स्थापना, शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले, स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य, पुणे नगर पालिकेचे सदस्य, दारू दुकानाना विरोध, पहिल्या कामगार संघटनेची स्थापना, 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी, सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणले.
महात्मा फुले यांचे साहित्य
मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे त्यांचे निधन झाले.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रंचड गाजले.
तृतीय रत्न नाटक -इ.स. १८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा- पोवाडा इ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह- इ.स. १८६९
गुलामगिरी लेखसंग्रह- इ.स. १८७३
शेतकऱ्यांचा आसूड- लेखसंग्रह इ.स. १८८३
सत्सार नियतकालिक- इ.स. १८८५
इशारा लेखसंग्रह- इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह- इ.स. १८८९
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
”
महात्मा फुले यांचे घराणे, फुलमाळ्यांच्या धंद्यातील कसबामुळे, पेशव्यांचे आश्रीत आणि इनामदार होते. या सुखवस्तू माळी कुटूबांत त्यांचा जन्म झाला. १८३४ पासून १८४७ पर्यंत पहिली १३ वर्षे त्यांची शिक्षण घेण्यात गेली. त्यांचे शेजारी गफारबेग मुनशी आणि लिजिटसाहेब या दोघांचा या तरतरीत तडफदार चौकस मुलावर लोभ होता. त्यांच्यापासुन मुस्लिम आणि ख्रिस्ती या दोन धर्माची माहिती मिळाली, त्यामुळे हिंदूधर्मातील अमानुष विषमता आणि नाना प्रकारच्या दुष्ट रुढी यांचे ज्ञान झाले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तीन ब्राम्हण विद्यार्थी मित्र. बायबलपासुन ते थॉमस पेन यांच्या,"राईटस ऑफ मॅन " या क्रांतीकारक ग्रंथापर्यंत इंग्रजी वाङमयाचा व्यासंग विद्यार्थी असतानाच जपला. गुरुजी लहूजीबाबा यांच्या तालमीत असताना "दयाळू इंग्रज सरकारला पालथे घालण्याकरीता", दांडपट्टीची आणि निशान मारण्याची कसरत ते शिकले. राज्यक्रांतीच्या कल्पनाही त्यांच्या डोक्यात येऊन गेली. १८२६ उमाजी नाईकांच्या दंग्यापासून तो १८४८ मधील राघोजी भांग्रे यांच्या दंग्यापर्यंत महाराष्ट्रात त्या वेळी अनेक दंगली होउन गेल्या होत्या. पण धर्मांतराच्या वेडाप्रमाणे हे 'वेडाचार' ही त्यांच्या डोक्यातून लवकरच निघून गेले.
रंजल्यागांजलेल्यांना साहाय्य करणे हा आपला धर्म ते मानीत, म्हणून खुद्द महात्मा गांधीजींनी - जोतीबांना 'खरा महात्मा' असे संबोधले आहे. जोतीरावांनी बोलीत आणि कृतीत विसंगती आणू दिली नाही. प्रत्येक वेळी ते कसाला उतरले आहेत.
बालविधवांना मदत
नैसर्गिक मोहाला बळी पडलेल्या बालविधवांना व त्यांच्या अपत्यांना जाहीर संरक्षण देऊन संगोपनासाठी आश्रम काढले. त्या आश्रमात २००० बालकांची सोय केली. स्त्रियांना शिक्षण मिळाल्याखेरीज देश शिक्षित व सुसंस्क्रुत होणार नाही, कुटुंबाची सुधारणा होणार नाही, हे जाणून स्त्रियांना शिक्षण देण्याकरीता जोतीरावांनी शाळा काढली. हिंदूस्थानातील ती पहिली शाळा.
अस्पृशांची शाळाही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात त्यांनीच प्रथम काढली. मुलांना पाणी प्यायला मिळेना म्हणुन स्वत:चा हौद खुला ठेवला. पण शाळेत शिक्षक मिळेनात, म्हणून जोतीरावांनी सावित्रीबाइंना शिकवून तयार केले व शिक्षिका बनवले. त्यांनाच दमदाटी देऊन, सावित्रीबाईंची टिंगल करून, दगड मारून शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न सनातनी ब्राम्हणांनी केला. त्यामुळे ते दांपत्य काही डगमगले नाही. तेव्हा त्यांना ठार मारण्याकरीता त्यांच्यावर मारेकरी घातले. ते मारेकरी मारण्यासाठी आले असताना जोतिरावांनी त्यांना विचारले,”काय रे बाबा, मी तर तुमच्यासाठी मरतो आहे आणि मला मारून तुमचा काय फायदा ?"त्यावर एक म्हणाला "आम्हाला एक हजाराचे बक्षिस मिळणार आहे ." “मग मारा तर!” म्हणून प्रतिकार न करता ते स्वस्थ बसले. या वाक्याने त्यांचा हृदयपालट झाला व शस्त्र टाकून ते त्यांच्या पायावर पडले. त्याला त्यांनी शिकवले व कुंभार हा पंडीत झाला. हे उदाहरण कोणाही महात्म्याला शोभण्याजोगे आहे .
त्यांनी केवळ सामाजिक व धार्मिक प्रश्नच हाती घेतले होते असे नाही. सर्व समाजातील थरांचा ते विचार करीत होते. मुंबईच्या मजुरांकडेही त्यांची दृष्टी वळली. मजुरांना १४ तास काम करावे लागे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच अवजड काम करावे लागे. मुलांनाही तेच त्रास होते. जोतीरावांचे सहकारी व अनुयायी लोखंडे यांनी मजुरांचा प्रश्न हाती घेतला. त्यांनी खास मजुरांसाठी पत्र काढले व मजुरसंघटना बनवली. महाराष्ट्रातील हिच पहिली मजुर संघटना होय.
जमिनीला बांध बांधून पाणी आडवावे, म्हणजे जमीन सुपीक होईल. धरणे बांधून नद्या आडवाव्यात. शेतकर्यांना कर्जमुक्त करावे. कमी रकमा देऊन गरज भागवावी, बी-बीयाणे औते, अवजारे पुरवावीत, उत्कृष्ठ जनावारांची पैदास करावी. उत्तम शेती करणार्यांना बक्षिसे द्यावीत. हे सारे विचार त्यांच्या लिखाणात आढळून येतात. खेड्यावरच्या निवडक हुषार मुलांना निवडून त्यांना अखेरपर्यंत शिक्षण मोफत द्यावे या कल्पेनाचाही पुरस्कार जोतीरावांनी केला होता.
त्यांनी विवाहबाह्य विधवेच्या मुलाला जवळ केले. त्याला फुले दांपत्याने पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले, त्याचे नाव 'यशवंत' ठेवले. आपल्या इस्टेटितला काही भाग त्याला तोडून दिला व ज्ञानोबा सासने नावाच्या आपल्या मित्राला त्याची मुलगी यशवंतला देण्याविषयी विनंती केली. त्या थोर चेल्याने ती मान्य केली.
सन १९८८ मध्ये ड्युक ऑफ कॅनॉट पुण्यास आले होते . जोतीरावांचे स्नेही हरी रावजी चिपळूणकर यांनी राजपुत्रासाठी एक मेजवानी आयोजीत केली आणि जोतिरावांना मेजवानीस आमंत्रित केले. जोतीराव मेजवानीस हजर राहीले पण गरिबीत दिवस काढणार्या शेतकर्याच्या वेषात. त्या प्रसंगी जोतिरावांनी इंग्रजीत भाषण करून शेतकर्यांची परिस्थिती कशी हलाखीची आहे ते राजपुत्राला समजावून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा