विजयादशमी (दसरा) नेमकी कुणाची १
--------------------------------गेली हजारो वर्षे देशात बहुजन समाज विजया दशमीचा सण साजरा करतो..पण तो नेमका करायचा कोणी व कशासाठी करायचा. हे कोणीच सांगितले नाही. या सणाच्या मुळापयर्यंत जाण्याचा प्रयत्न पहिल्यांदा क्रांतीसूर्य महात्मा फुले य़ांनी केला. आणि मग खरे सत्य उजेडात आले..अरे आपण ज्याला आपले म्हणतो ना ते आपले नाहीच...तरी कवटाळून बसलो आहे..आपलाच आपल्याला राग यायला लागतो..अन किती आपण खुळे याचेही खूप वाईट वाटायला लागते अन मन खवळून उठते..मेंदू, मन व मनगट शिवशिव करीत शिवविचार पुन्हा घोंगावू लागतो अन पुन्हा मग बळिचे राज्य येण्याची शाश्वती वाटू लागते.
वामन आपल्या सर्व फौजेसह बळीच्या राज्यात एकदम शिरून रयतेस पीडा(त्रास) देत राजधानी पर्यंत भिडला. त्यावेळी बळीने देशांवरच्या सगळ्या फौजा हजर होण्यापूर्वी आपली खाजगी फौज घेऊन वामनाबरोबर लढाई देण्याची तयारी सुरु केली. बळीराजा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्येपावेतो दररोज वामनाशी लढून संध्याकाळी आपल्या महालात आरामाला येत असे., यावरुन दोन्ही बाजुचे जेवढे लोक त्या पंधरावड्यात एकमेकाशी लढताना मृत्यूमुखी पडले. त्यांच्या मरणाच्या तिथी लक्षात राहव्यात म्हणून दरवर्षी पितृपंधरवडा घालण्याची प्रथा पडली. त्यानंतर अश्विन शु्द्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमीपर्यंत बळीराजा वामनाशी लढण्यात इतका गुंतला की, त्याला देहभान न राहिल्याने तो आरामास महालातही आला नाही..इकडे बळीराजाच्या विंद्यावली राणीने आपल्या खोजे आराध्याकडून एक खड्डा खोदून त्यात जळावू लाकडे टाकून ती खड्याजवळ आठ रात्री अन्नपाणी न घेता आपल्या पतीस जय मिळवून देण्यासाठी व वामनाची पीडा दूर व्हावी यासाठी हर हर महावीराची प्रार्थना करीत बसली. दरम्यान बळी रणात पडल्याची वार्ता कानावर पडताच तिने खड्यातील लाकडाला आग लावून त्यात उडी घेऊन ती मरण पावली. तेथून पुढे सतीची प्रथा सुरु झाली असावी. विंद्यावली राणी पतिच्या विरहाने आग्नीत उडी टाकून मरण पावली. त्यावेळी तिच्या सेवेतील स्त्रीया व खोजे आराध्यांनी उर बडवून अंगावरची वस्त्रे फाडून जाळली. उर बडवून राणीच्या गुणांचा आठव करीत ते खड्या भोवती फिरु लागले. माझे दयाळू राणीबाई। तुझा डांगोरा गरजला। असे म्हणू लागल्या. सनातनी ग्रंथकारांनी मात्र दुःखाची खपली उचकटू नये म्हणून त्या खड्याचा होम असल्याचे भासवून लबाड्या ग्रंथात लिहून ठेवल्या.
तिकडे बळी रणांगणात पडल्यावर बाणासुराने एक दिवस वामनाशी निखराचा लढा दिला. तसेच आपली उरलेली फौज घेऊन बाणासूर वद्य नवमीला पळून गेला. त्यानंतर वामन इतका मदमस्त झाला की, बळीराजाच्या मुख्य राजधानीत कोणी पुरुष नाहीत अशी संधी पाहून त्याने अश्विन शुद्ध दशमीस प्रातःकाळी राजधानीत आपले सैन्य घेऊन प्रवेश केला. व तेथे त्याने सर्व अंगणाचे सोने लुटले. (त्याचा अपभ्रंश शिलंगणाचे सोने लुटिले हा होय.) आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला. वामन (ब्राम्हणाचा पुर्वज) त्यांच्या घरात शिरतेवेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी (बहुजनांचा पुर्वज) थट्टेने घरात करुन ठेवला होता. त्यास तिने दाराच्या उंब-यावर ठेवून ती वामनाला अशी म्हणाली, की हा पहा बळी पुन्हा तुमच्याशी य़ुद्ध करण्यासाठी आला आहे. यावर वामन त्या कणकीच्या बळीलाथ मारुन घरात शिरला. त्या दिवसापासून विप्रांच्या (ब्राम्हण) कुळात दरवर्षी अश्विनमाशी विजयादशमीस त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदळाचा बळी दाराच्या उंब-या बाहेर करुन ठेवलेला असतो. त्याच्या उरावर डावा पाय ठेवून ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फाडतात. नंतर त्यास उलंघून घरात शि्रतात. अशी वहिवाट सापडते...
बळीराजाचा सेनापती बाणासूर,,हा बाणाईचा बाप व मल्हारी मार्तंड जेजुरीच्या खंडोबाचा सासरा होता. हे बाणासूराचे लोक (बहुजन) तेव्हापासून अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरी गेले. तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी यापुढे दुस-या बळीचे राज्य येवो म्हणून प्राथर्ना करतात. महिला ओवाळताना ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. असे म्हणत ओवाळतात. त्या दिवसापासून शेकडो वर्षे लोटली. तथापि बळीच्या राज्याच्या कित्येक भागातील महिला क्षत्रिय वंशातील स्त्रिया दरवर्षी पती व पुत्रास दशमीला ओवाळताना बळीचे राज्य येण्याची इच्छा अद्याप व्यक्त करतात...यावरुन बळीराजा किती उत्तम असेल..धन्य तो बळीराजा आणि धन्य ती राजनिष्ठा...
दशरथ यादव, पुणे (संदर्भ- गुलामगिरी-महात्मा फुले)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा