शिवधर्मगाथा
जिजाऊ शिवाचा। आहे जो बछडा।।
तोचि रे फाकडा। शिवधर्मी।।१।।
शिवधर्म मूळ। शिवबाचे कूळ।।
जिजाऊ राऊळ। सिंदखेड।।२।।
जात पात नाही। देवपूजा सोडा।।
भटाची ना पिडा। औषधाला।।३।।
सिंदखेड राजा। शिवधर्म पीठ।।
चालू केली वाट। गौतमाची।।४।।
आपुला तो आहे। खरा शिवधर्म।।
पूर्वजांचे वर्म। कळो येई।।५।।
दशरथ यादव, पुणे
आठवण
आठवण येते सखे
किती सोसू मी गं घाव
पंख लावी मन माझे
तुझ्याकडे घेते धाव
गुलाबाचे रान तुझे
काट्याची गं येते कीव
वाट तुझी पाहाताना
कासावीस होतो जीव
हरवून जातो कधी
आठवांच्या झुंबरात
शोध तुझा घेत घेत
उतरतो अंधारात
समजावता मनाला
वाटे हा आभास
ओठातून येती माझ्या
गोड गाणी ही उदास
तुझी ओढ बघ सखे
कशी छळते जीवाला
मुक्यानेच रडे मन
कधी कळणार तुला
दशरथ यादव, पुणे
वारीच्या गावात
माझ्या वारीच्या गावात
रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई
माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात
दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात
गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो
विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो
माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं
वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले
भगवी वस्त्रे गुंडाळून
सूर्य दर्शनाला येतो
माझ्या गावाच्या चरणी
माथा रविकरांचा टेकतो
विठ्ठलही रोज इथं
मुक्कामाला येतो
पहाट होण्या अगोदर
गाव उचलून नेतो
दशरथ यादव, पुणे —
शंभुराजे
फसवलंय तुम्हाला शंभुराजे याचा लागलाय सुगावा
औरंग्याच्या डोळ्यात पाणी दुसरा कशाला हो पुरावा ॥धृ॥
श्ऊशी नव्हतीच लढाई तुम्ही परंपरेशी लढलात
भीम पराक्रमाने तुमच्या सगळा गनिमही झुरावा ॥१॥
लढाया जिंकल्या तुम्ही पण कागदावर हरलात
भटाळलेल्या लेखण्या बदलून सांधावा लागेल दुरावा ॥२॥
सांगा कसं म्हणू तुम्हाला आता धर्मवीर आम्ही
धर्मानेच केला घात, कपटाने काढला कुरावा ॥३॥
आनंदासरु आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे
शिरच्छेद तुमचा व्हावा, धर्माचा कोंबडा आरावा ॥४॥
देवाची खाऊनी भाड हिजड्यांनी केला कावा
नामर्दाचा अंश अजून इथल्या मातीत उरावा ॥५॥
दशरथ यादव, पुणे —
सह्याद्रीच्या सुता
बारामती ग्राम। जन्मला शरद।
विकासाला छेद। हिमालय।।१।।
वारसा तुकाचा। फ़डकवी झेंडा
मोडोनिया बंडा। अन्यायाच्या
दिलीश्वर झुके। मराठीचा बाणा
शिवराय राणा। आपोआप
बहुजन मंतर। आळविला त्यांनी।।
सगळा धावला। वारकरी ।।१।।
तुकाराम नामा फुले आणि बाबा।।
छ्पती शाहू । अभ्यासला।।२।।
आधुनिक तं । शेतीत भरलं।।
धन वाढविलं । खळ्यामाजी।।३।।
विळखा शेतीला । कर्जाचा बसला।।
अस्वस्थ झाला। भूमिपूतर ।।१।।
करी कर्ज माफ । सोडविता फास।।
कुणब्याचा कस। जागवला।।२।।
पिकवले धान्य। अडवून पाणी।।
फुल्यांची वाणी । शिवरात।।३।।
साखळी तोडून। केलं स्ईला मुक्त।।
आर्क्सन दिलं। घरोघरी ।।१।।
कुणबी काबाड । फासात अडला।।
तिढा सोडवला। सावकारीचा।।२।।
कतृर्तत्वाने सा-या। दिशा उजळल्या।।
ज्योती पाजळल्या। प्रतिगामी।।३।।
शरदाचे भाळी। पसरे चांदणे।।
शेतीचे अंगण। गोंदियेले ।।१।।
शिवाजी शंभूचे। वारस हो तुम्ही।।
मराठ्याचा धर्म। जागविला।।२।।
जाणता हो राजा। आपण झालात।।
कतृत्व जगात। दाखवूनी।।३।।
सह्याद्रीचा सिंह। शेती शिक्शा तंतर।।
अवकाशी मंतर। जागवला ।।१।।
जगामाजी नेला। माझा महाराष्ट्र।।
पुरोगामी राष्ट्र। घडविले।।२।।
फुले शाहू बाबा । वाकविती नभा।।
विचारांचा गाभा। जपियेला।।३।।
शारदा मातेचा। पूतर पराक्रमी।।
विकासाची हमी। जनतेला ।।१।।
सत्य शोधकाचे। जुनेच घराणे।।
म्हणून धिराने । बोलतसे।।२।।
काटेवाडी गाव। कुणाला ना ठावे।।
भले भले राव। भेटलेना।।३।।
हिमालय बोले। सह्याद्रीशी गुज।।
व्हाना तुम्ही राजं। भारताचं ।।१।।
नभ पेलण्याची । ताकद तुमची।।
उगीच आमची। परीकशा।।२।।
सह्यद्रीच्या सुता। तुला दंडवत।।
राजाराम पुत। बोलियेला।।३।।
मुख्यमंतरी झाले। शरद पवार।।
किती हो सत्कार। गावोगावी ।।१।।
यशवंतराव । गुरुशिष्य जोडी।।
उभी केली गुडी। विकासाची ।।२।।
शिवाचा वारस। शोभती साहेब।।
फुकाचा गजब। सनातनी ।।३।।
संगणक ज्ञान। शेती करा छान।।
जपी मनोमन । सहकार।।१।।
ऐंशी टक्के जपा। समाजकारण।।
करा राजकारण। उरलेले ।।२।।
वेळ आणि शिस्त पाळायची हमी
घेतली ना तुम्ही आम्हाकडे।।३।।
क्रिकेट कबड्डी। कुस्तीत आभाळी।।
जगाला भुपाळी। शिकवली।।१।।
भाषण तुमचे । आम्हा मिळे ज्ञान।।
होती कीती जन। सज्ञान।।२।।
पोलिसांचा वेष । बदलला तुम्ही।।
जना दिली हमी। संरकशन।।३।।
तरुणांनी यावे। उद्योजक व्हावे।।
जनलोका द्यावे। समाधान।।१।।
काय सांगू तुम्हा। सागाराची खोली।।
मोजता न आली। कुणालाही।।२।।
हिमालय पडे । फिका तुम्हा पुढे।।
राशीवर राशी। कतृत्वाच्या।।३।।
दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१ —
पुरंदर
क-हाकाठी मातीतून
घुमतो एक पुकार
मर्द मराठ्यांनी इथे
गाजवली तलवार
उसळून कोसळे वीर
मुरारबाजी हा थोर
कारकुड किल्लेदार
बेंगळे मानीना हार
किल्ल्यावर होते
मावळे चिमूटभर
ढासळले हे दगड
सपासप केले वार
ध़डाडून पडल्या तोफा
दिलेरखान झाला गार
हर हर गर्जनेने
शत्रू भेदला आरपार
अभेद्य होता पुरंदर
वज्रगड त्याच्या आड
शत्रू कापी चराचरा
मोगलांची मोडे खोड
शिवशाही बीज इथे
मातीत रुजली खोल
शंभू शिवाचा हा छावा
बोलतो बोबडे बोल
लढताना हो पडला
बाजी पासलकर
गरगरा फिरे पट्टा
गोदाजी करी कहर
दौलत मराठ्यांची
पानीपतात गेली
बेईज्जत महाराष्ट्राची
यो पेशवाईत झाली
कुंजीर कामठे माने
जाधवराव पोमण
जगताप खेडेकर
इंगळे काळे रोमण
५२ सरदार इथले
अटकेपार लावी झेंडे
पुढे जानोजी भिंताडा
लढे मानाजी पायगुडे
मातीला इथल्या येतो
गंध या इतिहासाचा
द-या खो-यातून घुमतो
आवाज शिवशाहीचा
क्रांतीवीर उमाजीनं
इंग्रज केला हैराण
या कडेकपारीतून
त्याचं उठवलं रान
बुलंद बाका पठारी
मंदिरे शिवाची सात
सात गडांचा पहारा
खडाच नऊ घाटात
भंडा-यात न्हाला गड
पैलतीरी भुलेश्वर
क-हा घेऊन कवेत
नांदतो पांडेश्वर
रामायण लिही वाल्ह्या
घडवून चमत्कार
म्हस्कोबा गुलालाने
रंगवितो गाव सारे
भिवरी बोपगावाला
कानिफनाथांचा वास
पोखर नारायणपूरला
दत्त मंदिरी आरास
मराठी पिळाची पगडी
गडकोट बहारदार
स्वाभिमानी हा बाणा
माझा जपतो पुरंदर
सोपानाने शेवटचा
श्वास इथेच घेतला
घे-यातल्या मावळ्यांनी
छातीचा केलाय कोट
चिव्हेवाडीनं धरलं
काळदरीचे हे बोट
पानमळा बागाईत
वीर परिंचे खो-यात
सीताफळ अंजिराने
गु-होळी राजेवाडीत
छत्रपती शिवाजींचा
उद्धार फुल्यांनी केला
कुळवाडी भुषण ऱाजा
सांगितला हो जगाला
बेलसर व नाझंर
क-हामाईची लेकर
दिवे,सोनोरी माहूर
गडाचे किल्लेदार
नीरा क-हेच्या खो-यात
असा इतिहास घङला
कुणब्यांनी इथल्या
दुष्काळ मातीत गाडला
पुरंदराच्या मातीत
निसर्गाची नवलाई
फळे फुले पालेभाज्या
इथे पिके आमराई
क-हाकाठाची मंदिरे
खुणावती पुन्हा मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे तुला
पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा
दशरथ यादव, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा