साहित्याची पायवाट

मंगळवार, १० डिसेंबर, २०१३

 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमंत्रण पत्रिका






बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

devayani ----dasharath yadav poto

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे तमाशा कलावंत मंगला बनसोडे करवडीकर, सारंगी महाजन उपस्थित होते. — 



मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज
----------------
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ साली झाला. बालपणीच दोन वर्षाचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले. राजामाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथील धाराउ गाडे या मातेचे दूध देवून संभाजी राजांचे पोषण केले. क-हाकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्रि डोंगर रांगेवरील हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदरगडाच्या पायथ्याला मावळयांचा मुलासोबत शंभुराजांचे बालपण गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा व शौर्याने संभाजीराजांची राजकारण, साहित्य, समाजकारण याविषयीची दृष्टी अधिक दृढ होत गेली. राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले. सुरवातीला त्यांची सावत्रआई सोयराबाई यांनीही खूप माया केली.
शंभुराजे देखणे व शूर होते. राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले. मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयात कळाले. वयाच्या ९ व्या वर्षीच शिवरायांनी त्यांना जाणीपूर्वक आग्रा येथे आरंगाजेबाच्या भेटीवेळी नेले होते. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदैतून निसटल्यानंतर संभाजीराजांना तेथेच ठेवून ते निघाले. मोरोपंत पेशव्याचे मेहुणे तेथील होते, त्यांच्या घरी त्यांना ठेवले. मोगली सैनि्कांचा ससेमिरा थांबविण्यासाठी संभाजीराजांच्या निधनाची अफवाही त्यांनी सोडली. स्वराज्यात शिवराय आल्यानंतर काही काळाने शंभुराजे पोचले.
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोपर्य़ंत संभाजीराजे बारकावे व रणांगणातील डावपेचात तरबेज झाले होते. त्यांनी राज्याभिषेकासाठी आलेल्यांना नम्र स्वभावाने जिंकून घेतले. राज्यभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे झाले. शिवाजीराजे राजकारण व रणांगणावर गुंतले होते. शंभुराजाकडे लक्ष कोण देणार..त्यांचे शिवरायांच्या दरबारातील अनुभवी मानक-यांशी अनेकदा मतभेद होउ लागले. अमात्य अणणाजी दतो यांच्या कारभाराला शंभुराजाचा सक्त विरोध होता. शिवाजीमहाराजांनी अण्णाजी हे कुशलप्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ठकारभाराकडे दुर्लक्ष केले होते. पण संभाजीराजांना ते मान्य होण्यासारखे नव्हते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले. असे उद्घार काढल्याने ते व मानकरी शंभुराजांवर नाराज होते. सोयराबाई व अण्णाजी दतो यांच्या विरोधामुळे शिवाजी राजांना दक्षिण हिंदूस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. शिवाजीराजांच्या अनुपस्थित संभाजीराजांचा हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळ नकार देत. त्यामुळे महाराजांना कोकणातील शृंगारपुरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना तिकडे पाठवावे लागले.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत, राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.

साहित्यिक संभाजीराजे

अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत चा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे:

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा,करितो धर्माचा ऱ्हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "




मोगल सरदार

अष्टप्रधान मंडळाच्या या प्रवृतीमुळे व्यथित होऊन शंभुराजांनी औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांनतर  दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळेने किल्ला नेटाने लढवला. शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत, हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. दिलेरखानाने जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकऱ्यांमधील दरी अजूनच रुंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामाच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामाच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे गादीचे हक्काचे वारसदार होते. शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला. अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.

अण्णाजी दतो मारला
१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले )

श्री सखी राज्ञी जयति - छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती - हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश (कलुषा)
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत


औरंगजेबाची दख्खन मोहीम

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते. त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती, की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की, तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.


दगाफटका
इ.स. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्क्याने कमालीची गुप्तता बाळगली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

त्यानंतर संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले.  औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक धिंड काढली.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती.  पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. तुळापूरच्या संगमावर हाल करुन त्यांची हत्या केली.
बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. .
राजांची हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे करण्यात आली.


शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते. त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यामुळे देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा, तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि, ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ, पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत.  
औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते, जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते, ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं. तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता. तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत. हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे.

युवराज असून देखील दुर्दैवाने त्यांना योग्य तो मानमरातब मिळाला नाही. घरातील बेबनावांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःसोबत कर्नाटकच्या मोहिमेवर न घेता, श्रीरंगपुरला सुभेदार म्हणून धाडले. श्रीरंगपुर संभाजी महाराजांची सासुरवाडी होती. कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत असताना महाराजांच्या स्वागतासाठी संभाजी महाराज श्रीरंगपुरच्या वेशीवर उभे होते. शिवाजी महाराज पन्हाळा, सातारा, महाबळेश्वर मार्गे रायगडावर परतले.
हिंदवी स्वराज्य ५ मोठ्या शत्रूंच्या तावडीत सापडले असताना धडाडीने, ज्याने तडफेने ह्या सर्वाना तोंड दिले असा हा स्वराज्याचा दुसरा छत्रपती. शिवधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
संभाजी महाराजांच्या जीवावर उठलेला औरंगझेब ५ लाख फौज घेऊन मराठ्यांना संपवण्यासाठी दक्षिणेत उतरला. त्याला धीराने तोंड देताना, गोवेकर पोर्तुगीज, इंग्रज, जंजिरेकर सिद्दी, तसेच फंदफितुरीने बरबटलेले घरातलेच स्वकीय शत्रू ह्या सर्वाना समर्थपणे तोंड देता देता मृत्यूलाही कवटाळले. त्यांच्या पराक्रमाने आणि निर्भयपणे स्वीकारलेल्या मृत्यूमुळे निदरिस्त झालेल्या मराठ्यांत नवचैतन्य उसळल आणि औरंगझेब महाराष्ट्रातच गाडला गेला. पुढे याच मराठी अश्वपथकानी थेट दिल्ली वर धडक देऊन उत्तरेत आपली सत्ता स्थापन केली. हे शक्य झाला केवळ शंभू राजांच्या बलिदानामुळेच.




शाईस्तेखानचा पराभव, पुरंदरचा तह, औरंगजेब यांची भेट, आग्र्याहून शिवाजी महाराजांनी केलेले पलायन, यातून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. संभाजी राजांना पाच हजारी मनसब, पाच हजार स्वार, ज्यांची दोन घोडी असावीत, त्याप्रमाणे देऊन पोशाख आणि पंजाच्या शिक्क्यासह हा फर्मान पाठवला आहे. संभाजी राजे वयाच्या आठव्या वर्षीच मुगल मनसबदार झाले.  शिवाजी महाराजांनी औरंगजेबास विरोध दर्शवला त्याची दखल संपूर्ण भारताने घेतली, ह्या घटनेचे साक्षीदार संभाजी राजे होते.  ह्याच औरंगजेबासोबत शिवाजी महाराजांच्या कैलासवासानंतर सतत ९ वर्षे लढा संभाजीराजांनी दिला.


 
भूपाळगड

 ११ मे १६७८ रोजी शिवाजी महाराज स्वराज्यात परतले (जे.श). शृंगारपुरमधे घडलेल्या सर्व हकीकती महाराजांना हेरांकरवी समजल्या. याच दरम्यान ४ महिन्याचा कालावधी गेला आणि येसूबाई यांना कन्यारत्न प्राप्त झाले, दिवस होता ४ सप्टें १६७८. त्यांचे नाव भवानीबाई ठेवण्यात आले कवी कलश शंभू राजांचा कंठ कौस्तुभ बनला होता.कागदपत्रे वाचताना एक गोष्ट स्पष्ट समजते की कवी कलश शंभूराजांशिवाय इतर कुणालाही प्रिय नव्हता. किंबहुना रायगडावर तो केवळ शंभू छत्रपतींमुळेच टिकून होता.








शिवाजी महाराजांनी मोहीम हाती घेतली होती ती तळ कोकणाची. शिर्के हे महाराष्ट्रातील फार प्राचीन घराणे, त्यावेळी शिर्क्यांकडे दाभोळचे वतन होते. तळकोकण स्वारीत जसवंतरावच्या पालीवर कब्जा झाल्यावर महाराजांनी लगोलग दाभोळ देखील काबीज केले आणि शिर्क्यांचे दाभोळचे वतन स्वराज्यात अनामत करून त्यांना स्वराज्य सेवेत रुजू करून घेतले. यानंतर २९ एप्रील १६६१ मधे महाराजांनी सूर्यराव सुर्वे यांचे शृंगारपुर ताब्यात घेऊन सर्व वतनदारांचा असणारा अंमल हा संपुष्टात आणला. महाराजांनी यावेळी एक निर्णय घेतला व पिलाजीराव शिर्के यांच्याशी सोयरिक केली. आपली एक मुलगी राजकुंवरबाईसाहेब आणि  पिलाजीरावांचा मुलगा गणोजी शिर्के यांचा विवाह करून दिला, हेच नाते अधिकच दृढ करण्याहेतूने महाराजांनी पिलाजीरावांची मुलगी जिऊबाई (येसूबाईसाहेब) आणि संभाजीराजे यांचा देखील विवाह केला.
समकालीन फारसी साहित्यामध्ये भोसले – शिर्के वितुष्टाचे उल्लेख आढळतात.
१) मुकर्रबखान याने संभाजीची बातमी आणण्यासाठी स्वताचे हेर नेमले होते, एकाएकी त्याला बातमी लागली की संभाजी राजे आणि त्याचे आप्त असणारी शिर्के मंडळी यांचे भांडण झाले. (मा.आ)
२) कवी कलश हा फजित पावून खेळण्यास दडून बसला हे पाहून संभाजीने आप्तेष्टांना कैद केले, भयंकर छळ होऊ लागला. फु.आ)

कवी कलशाच्या या नसत्या उठाठेविमुळे स्वराज्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली. भोसले – शिर्के हे संबध तर बिघडले.मुकर्रबखानाने शंभूराजांना पकडले आणि अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली.
ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलून धरल, जो माणूस वादळा सारखा ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोर्यात घोंगावत राहिला.
इतिहासामध्ये ज्यांची नोंद एक हि लढाई न हरलेला राजा म्हणून आहे. १२० लढाया एक हि हार नाही, एक हि तह नाही .. एकाच वेळी ३-४ दुष्मनांसोबत निकराची लढाई देणारा राजा म्हणून संभाजी राजांची नोंद इतिहासाने घेतली

टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत. त्यांच्या साडे आठ वर्षाच्या कालावधी मध्ये एक हि बंड झाले नाही. तमाम मराठा समाज त्यांच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य चौपटीने वाढवण्याचे कार्य संभाजी राजांनी केले.
याच संभाजी ने वयाच्या चौदाव्या वर्षी एक संस्कृत मधून ग्रंथ लिहिला.. त्याचे नाव "सात-सतक" मानवी जीवन मुल्यांवर चर्चा करणारा हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला .. बुध भूषणम् याच संभाजी ने लिहिला पण हे आम्हाला माहित नाही . भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा.

रामदास स्वामीचा शिष्य रंगास्वामीने महाराजांना औरांजेबाच्या तावडीत पकडून दिले,
याच संभाजीचा चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच काही हरामखोर बखरकारांनी आणि इतिहास करांनी केले आहे, खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्य सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी राजांचा राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच.


अन महारानी संभाजी महाराजांचा अंतिम विधी केला.
संभाजी महाराजांचा मृत्यू म्हणजे मराठी साहित्यिकांची मेजवानी. त्यावर कित्येक मराठी साहित्यिकानी विस्तॄत लिखान केलं. त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगानीतर उभा महाराष्ट्र थरथरतो असे लिहान साहित्यिकानी उतरवून ठेवले. यातील खरं किती खोटं किती माहीत नाही. पण औरंगजेबानी त्यांचे हाल हाल करुन अत्य़ंत क्रूरपणे जीव घेतला हे सर्वमान्य आहे. यावरुन काहिनी त्याना चक्क धर्मवीर ठरवून टाकले तर काहिनी मृत्य़ूशी लढणारा वीर. एकंदरीत संभाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, धोरनात्मक वृत्ती अन लहान वयातच लिलया पेलणारं सेनापती पद या सर्व गोष्टींपेक्षा सर्वात जास्त चर्चेत राहिलेली गोष्ट कुठली तर त्यांचं मृत्यू. याला कारणीभूत कोण तर या मृत्य़ूला रंगविणारे  लेखक-कादंबरीकार. ते औरंगजेबाच्या पुढे पेश केल्या नंतर कसे स्वाभिमानाने बोलले, मग औरंग्यानी त्याना कसे मारले या सर्व गोष्टी ईतक्या ईतक्या रंगविण्यात आल्या की मराठी मातीतील शेंबडया पोरालाही संभाजीचा मृत्यू माहित आहे. पण हे सर्व करताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट जाणिवपूर्व अनफोकस ठेवण्यात आली.
ती म्हणजे संभाजीच्या मृत्यू नंतर त्यांची उत्तरक्रिया महार समाजानी केली. संभाजी व कवी कलशची समाधी वढू गावातील महार वाड्याला लागून आहे. औरंग्याच्या दहशतीला न जुमानता आपल्या प्रिय राजाचा अंतिम संस्कार पार पाडणा-या धीरोदात्त अशा महार समाजाचं कर्तूत्व मोठे आहे.
मनुस्मृतीनुसार राजांची हत्या पंडितानी केली.  त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करुन वढू गावाच्या शेजारी फेकण्यात आले. त्या नंतर अशी दवंडी पिटण्यात येते की जो कोणी संभाजी वा त्याच्या गुरुची अंतिम क्रिया करेल त्याची धडगत होणार नाही. औरंग्याच्या या धमकीला गावकरी घाबरतात.   संभाजी व कवी कलशाचा अंतीम विधी गावक-यानी व मराठ्यानी केला असता तर त्यांची समाधी ईतर कुठेही असती पण ती आहे चक्क महारवड्याला लागून.
वीर महारांचा धाडसीपणा
संभाजीच्या शरीराच्या तुकड्यांची दशा पाहून एक समाज खवळून उठतो. औरंगजेबाच्या धमक्याना न जूमानता थेट घराच्या बाहेर पडतो व आपला प्रिय राजा संभाजीच्या शरिराचे तुकडे गोळा करतो. हिंदुस्थानच्या शहंशाहच्या विरोधात जाऊन महाराजांची अंतीमक्रिया करण्याचं अस धाडसं दाखविणारा समाज दुसरा तीसरा कुणी नसून निधड्या छातीचा माझा महार समाज होता. संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्यात येतात. त्याच बरोबर कवी कलशाचेही तुकडे गोळा करण्यात येतात. वढू गाव अत्यंत दहशतीखाली जगत असताना असं धाडस करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण महारांची शूरता काय असते ते आजून औरंग्याला माहित नव्हतं. महार जेंव्हा पेटून उठतो तेंव्हा वादळ स्वत:ची दिशा बदलतो. याचे इतिहासातील कित्येक पुरावे जरी सनातन्यानी लपविले तरी ते अधून मधून डोकावतातच. महारानी अत्यंत नियोजनपुर्वक कामगिरी पार पाडण्याचे ठरविले. शरीराचे तुकडे गोळा करण्यासाठी घराबाहेर पडताना महारानी तृतीयपंथीयाचा वेष धारण केला. महार जात मुळात विविध कला गुणानी संपन्न होतीच. पण या कलेचा वेळ प्रसंगी देशासाठी वापर करण्याचा निधडेपणाही माझ्या बांधवांच्या ठायी होता. .




दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१









जेजुरीचा खंडोबा

जेजुरीचा खंडोबा

----------------
मा. दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१
-----------
जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव आहेत. मराठी माणसांच्या मनामनात दोन्ही देवांबाबत तितकीत आपुलकी आहे. पुरंदर तालुक्यात पुण्यापासून सुमारे तीस मैल अंतरावर जेजुरी येथे खंडोबाचे देवस्थान आहे. धनगर, कोळी, मराठा, व इतर अनेकांचे हे आराध्यदैवत आहे.
इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले. सभोवतालच्या ओव-या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.
गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पाय-या, दीपमाळा, कमानी उभारल्या आहेत. बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची कल्पना येते.

जेजुरीचे शिखर व समोरच्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता.  देवळाच्या ओव-या ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.
देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळि भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला.

खंडोबाची यात्रा व जत्रा ः खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळि भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो.

खंडोबाची स्थाने
--------------
जेजुरी (पुणे), पाली (सातारा), मंगसुळी (बेळगाव), देवरगुड्डा (राणीबेन्नूर), मैलार लिंगप्पा (खानापूर), बेल्लारी), मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा), आदि मैलार (बीदर), अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद), माळेगाव (नांदेड), सातारे (औरंगाबाद), शेगुड (अहमदनगर) व निमगाव धावडी (पुणे).
खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते. खंडोबाचे मुळ पीठ जेजुरी आहे.
खंडोबा हे नाव देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग > मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद > स्कंदोबा > खंडोबा) याखेरीज मल्हारी (मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे, असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी > नळदुर्ग > पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले. खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मा्र्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे. जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती. मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला.
कुळाचार - दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.
जागरण - गोंधळ : देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरणे : तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात. खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात.


मल्हारी महात्म्य.

संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.
एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

दंतकथा
सावकारी भुंगा : औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने माळशिरसचा दौलतमंगल किल्ला काबीज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले, असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढविला. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रुपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात.
भाया भक्ताची साक्ष : एकदा कडेपठारावर धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडिलधार्यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडील माणसेव विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला. तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरील कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती.
जेजुरी : वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधिपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्रा उत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो. डफ, मर्फा, सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

अभिनेत्री निशा परुळेक

सिनेमा गीत प्रकाशन

सयाजी शिंदे मुलाखत

मराठा, कुणबी एकच

मराठा आरक्षण
शोध व बोध  ( भाग २)

ऐतिहासिक दाखल्यांमध्ये मराठा, कुणबी  एकच
----------------------------------------------

ऐतिहासिक दाखल्यांमध्ये मराठा व कुणबी एकाच जातीचे असल्याचे स्पष्ट होत आहे? ऐतिहासिक दाखले, इंग्रजांनी तयार केलेले अहवाल व स्वातंत्र्यपूर्व काळातील न्यायालयाच्या दाखल्यांतून या मताला दुजोरा मिळत असल्याने राणे समिती नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे मराठ्यांसोबत सर्व ओबीसींचे लक्ष लागले आहे. राज्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात समावेश करण्यासंदर्भात राज्य सरकारला शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू आहेत. मराठ्यांना ओबीसीमध्ये स्थान देण्यास राज्यातील ओबीसींचा विरोध आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका तळ्यातमळ्यात आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा कुणबीच असल्याची शिफारस केल्याची समजते. न्या. सराफ अध्यक्ष असताना राज्य मागासवर्ग आयोगाने हा अहवाल 2006 मध्ये राज्य सरकारकडे सोपविला आहे. या अहवालात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राजकीय अडचणींमुळे राज्य सरकारने या अहवालावर गेल्या सात वर्षांपासून काहीच निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाकडून दबाव वाढत असल्याने 21 मार्च 2013 रोजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीला 10 जुलै 2013 रोजी पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
काशीराव बापूजी देशमुख यांनी 1927 मध्ये लिहिलेल्या "क्षत्रियांचा प्राचीन इतिहास' या ऐतिहासिक ग्रंथात मराठा व कुणबी हे एकच असल्याबद्दल अनेक दाखले दिले आहेत. या ग्रंथाच्या पान क्रमांक 105 वर यासंदर्भात 1921 च्या वर्धा येथील सत्र न्यायालयाचा आदेश उद्‌धृत केला आहे. यात मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. एक कुणबी युवतीचे लग्न मराठा समाजातील व्यक्तीशी झाल्याने हा खटला उभा झाला होता. त्यावेळच्या न्यायाधीशांनी हा विवाह कायदेशीर ठरवीत मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर शिवाजी महाराज साताऱ्याचे छत्रपती, ग्वाल्हेरचे शिंदे हे कुणबीच असल्याचे या पुस्तकात (पान क्र. 91) म्हटले आहे. "कुलंबीज' या संस्कृत शब्दापासून कुळंबी हा शब्द आला. कुळंबीचा अपभ्रंश होत कुणबी शब्द रूढ झाल्याचा दावा पुस्तकात केला आहे. यासाठी हंटर्स स्टॅटिस्टिकल अकाउंट ऑफ बेंगाल व्हॉल्यूम 11 या खंडाचा संदर्भ दिला आहे. एवढेच नव्हे, तर बॉम्बे गॅजेटिअर्स, सातारा खंड 19 च्या पान क्र. 75 वर मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. 1881 च्या जनगणनेत मराठ्यांना कुणबी जातीमध्ये समाविष्ट केल्याचे गॅजेटिअरमध्ये नमूद केले आहे.
याशिवाय मुंबई गॅझेटियर, बेळगाव खंड 21, मुंबई गॅझेटियर, खंड 9, मुंबई गॅझेटियर, पुणे भाग 18, 1881 च्या बेरार जनगणना अहवालातही मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट केले आहे. खामगाव येथे 29 डिसेंबर 1917 रोजी मराठा शिक्षण परिषद आयोजित केली होती. या परिषदेने मराठा हे कुणबीच असल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व ऐतिहासिक, न्यायालयीन व इंग्रजांच्या विविध अहवालांवरून मराठा व कुणबी एकाच जातीचे असल्याचे स्पष्ट होत आहे?
आयोगाच्या मान्यतेविनाच "मराठा-कुणबी' मागासवर्गात आहेत.
श्रीमंत मराठ्यांना नाही; तर गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी मराठा संघर्ष समितीचा लढा अविरत सुरू राहील, मराठा ही जात नसून तो समूह आहे; त्यामुळे कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक नसून कुणबी व मराठा हे जातीने एकच आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अविरत संघर्ष करण्याची भूमिका मांडत मराठा विकास संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, छावा संघटना, भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, मराठा समन्वय समिती, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा रियासत या साऱ्या संस्था-संघटनांनी एकत्र येऊन मराठा संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही औपचारिक चर्चा केली. मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही भेद नसल्याचे विषद केले.

शिवनेरी येथे आंदोलन.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी किल्ले शिवनेरी येथे आंदोलन केले. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा व आरक्षणाची मर्यादा वाढवून तीस टक्‍के आरक्षण मराठा समाजाला द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मागील काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे.
मराठा सेवा संघाने . मराठा समाजास सरसकट ओबीसी घोषित करावे, या साठी मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी दिनांक ०६-०८-१९९६ रोजी बैठक केली. मराठा समाजाचे त्यावेलेचे अनेक मराठा कुणबी आमदार,खासदार, मंत्री उपस्थित होते, दि.१४-१२-२००५ रोजी नागपुर येथे बोलावण्यात आली होती, शासनाने ह्या साठी "खत्री आयोगाची"नेमणूक केली होती. सध्याच्या विधानसभेत समाजाचे १५० सदस्य आहेत.त्यामुले "मराठा-कुणबी" किंवा "कुणबी-मराठा" अशी नोंद असनारयांचा समावेश ओबीसीत करण्याचा निर्णय शासनाने १ जून २००५ रोजी घेतला आहे. २३-१२-२००७ नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री विलासराव देशमुख ह्यानी संभाजी ब्रिगेड सोबत झालेल्या चर्चेनंतर ही मागणी मान्य करून सहा महिन्यांचा अवधी मागितला होता,ही मुदत संपल्यामुले हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.थोडक्यात १९९१ ते २००८ ह्या सतरा वर्षाच्या कालावधीत सातत्याने ह्या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे.

ओबीसी आणि मराठे एकच
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करून ओबीसींचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न कशाला, असा प्रश्न ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे, तर ओबीसी आणि मराठे हे एकच असून आपापसात भांडण्यापेक्षा ओबीसींनी मराठय़ांना आपल्यात सामील करून घ्यावे आणि आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढा द्यावा, ओबीसी प्रवर्गातून अगोदरच कुणबी-मराठा, लेवा पाटील, तेली मराठा आदी मराठा समाजातील जातींना आरक्षण मिळत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला पुन्हा त्याच प्रवर्गातच वेगळे आरक्षण कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जातो.
धनगर, वंजारी व इतर काही जातींना पूर्वी आरक्षणाच्या सवलती मिळत नव्हत्या. भाजप-शिवसेना युती काळात गोपीनाथ मुंडे समितीने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे. त्या धर्तीवर राज्य शासनही आरक्षणाच्या टक्केवारीत वाढू करू शकते
राजर्षि शाहू महाराजानी १९०२ साली आपल्या संस्थानात बहुजन समाजाला सरसकट 50% आरक्षणदिले। यात मराठा समाजाचाही समावेश होता। म्हणजे मराठा समाज ही आरक्षणाचा हक्कदार आहे, हे लक्षात येइल। मुळात मागास वर्गाच्या आरक्षणामुळे समाज इतका ढवळून निघत असताना मराठ्यांच्या आरक्षणाचा विचार तर दूरच मुख्य प्रश्न आहे तो मानासिकतेचा। आणि ती मानसिकता आहे उच्च वर्णियान्च्या अहंकाराची आणि बहुजनान्च्या न्यूनगंडाची । ही सर्व परिस्तिथि लक्षात घेउन मराठा सेवा संघ व् समविचारी संघटनानी सध्याच्या आरक्षणाला धक्का ना लावता मराठ्याना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे। आज काही ब्राम्हण संघटनानिही १०% आरक्षणाची मागणी केली आहे। परंतु मराठ्यांचे आरक्षण आणि ब्राम्हणाचे आरक्षण यात जमीन आसमानाचा फरक आहे। ज्याना पूर्वी संधि नाकारण्यात आली होती अशाना संधि उपलब्ध करून देने हे आराक्षनाचे मुख्य धोरण आहे। ब्राम्हानाना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अथीक, शैक्षणिक आशा सर्वच क्षेत्रात संधि उपलब्ध होत्या। मराठा व् इतर बहुजनाना मात्र अशा संधि नाकारण्यात आल्या होत्या। आज जरी काही मराठे सधन असले तरी अनेक लोक हलाखीचे जीवन जगात आहेत। जर मराठा आरक्षण मंजूर झाले तर मराठ- दलित हे सम्बन्ध ही सुधारातिल। अर्थात मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे मराठ्याना आराक्षनाची गरज आहे आणि ती सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्यात आली तरच मराठ्याना न्याय मिळेल। मराठ्यानिहि आरक्षणाचा विचार बुद्धिवदातून केला पाहिजे.
आरक्षण: माझी काही मते
मराठा समाज सोयीप्रमाणे स्वता:ला ९६-९२ कुली समजतो आणि आता सोयीस्कर रीत्या आम्ही कुणबी आहोत असे प्रतिपादन करत आहे. माझे स्पष्ट मत असे आहे कि मराठा ही "जात" कधीच नव्हती. सातवाहन कालापासून महारत्ठी हा शब्द प्रचलित झाला आणि हा शब्द पदवाचक होता. जात- वाचक नव्हे. हे पद कोणालाही, लायक माणसाला मिळू शकत होते आणि ते वंश-परंपरात्मक नव्हते. उदा. सात्वाहानातील नागनिका या राणीचा पिता "महाराठ्ठी" होता (पद) पण तो नाग वंशाचा होता.

विजयादशमी कुणाची १



विजयादशमी (दसरा) नेमकी कुणाची १ 

--------------------------------
 गेली हजारो वर्षे देशात बहुजन समाज विजया दशमीचा सण साजरा करतो..पण तो नेमका करायचा कोणी व कशासाठी करायचा. हे कोणीच सांगितले नाही. या सणाच्या मुळापयर्यंत जाण्याचा प्रयत्न पहिल्यांदा क्रांतीसूर्य महात्मा फुले य़ांनी केला. आणि मग खरे सत्य उजेडात आले..अरे आपण ज्याला आपले म्हणतो ना ते आपले नाहीच...तरी कवटाळून बसलो आहे..आपलाच आपल्याला राग यायला लागतो..अन किती आपण खुळे याचेही खूप वाईट वाटायला लागते अन मन खवळून उठते..मेंदू, मन व मनगट शिवशिव करीत शिवविचार पुन्हा घोंगावू लागतो अन पुन्हा मग बळिचे राज्य येण्याची शाश्वती  वाटू लागते.
    वामन आपल्या सर्व फौजेसह बळीच्या राज्यात एकदम शिरून रयतेस पीडा(त्रास) देत राजधानी पर्यंत भिडला. त्यावेळी बळीने देशांवरच्या सगळ्या फौजा हजर होण्यापूर्वी आपली खाजगी फौज घेऊन वामनाबरोबर लढाई देण्याची तयारी सुरु केली. बळीराजा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून वद्य अमावस्येपावेतो दररोज वामनाशी लढून संध्याकाळी आपल्या महालात आरामाला येत असे., यावरुन दोन्ही बाजुचे जेवढे लोक त्या पंधरावड्यात एकमेकाशी लढताना मृत्यूमुखी पडले. त्यांच्या मरणाच्या तिथी लक्षात राहव्यात म्हणून दरवर्षी पितृपंधरवडा घालण्याची प्रथा पडली. त्यानंतर अश्विन शु्द्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमीपर्यंत बळीराजा वामनाशी लढण्यात इतका गुंतला की, त्याला देहभान न राहिल्याने तो आरामास महालातही आला नाही..इकडे बळीराजाच्या विंद्यावली राणीने आपल्या खोजे आराध्याकडून एक खड्डा खोदून त्यात जळावू लाकडे टाकून ती खड्याजवळ आठ रात्री अन्नपाणी न घेता आपल्या पतीस जय मिळवून देण्यासाठी व वामनाची पीडा दूर व्हावी यासाठी हर हर महावीराची प्रार्थना करीत बसली. दरम्यान बळी रणात पडल्याची वार्ता कानावर पडताच तिने खड्यातील लाकडाला आग लावून त्यात उडी घेऊन ती मरण पावली. तेथून पुढे सतीची प्रथा सुरु झाली असावी. विंद्यावली राणी पतिच्या विरहाने आग्नीत उडी टाकून मरण पावली. त्यावेळी तिच्या सेवेतील स्त्रीया व खोजे आराध्यांनी उर बडवून अंगावरची वस्त्रे फाडून जाळली. उर बडवून राणीच्या गुणांचा आठव करीत ते खड्या भोवती फिरु लागले. माझे दयाळू राणीबाई। तुझा डांगोरा गरजला। असे म्हणू लागल्या. सनातनी ग्रंथकारांनी मात्र दुःखाची खपली उचकटू नये म्हणून त्या खड्याचा होम असल्याचे भासवून लबाड्या  ग्रंथात लिहून ठेवल्या.
     तिकडे बळी रणांगणात पडल्यावर बाणासुराने एक दिवस वामनाशी निखराचा लढा दिला. तसेच आपली उरलेली फौज घेऊन बाणासूर वद्य नवमीला पळून गेला. त्यानंतर वामन इतका मदमस्त झाला की, बळीराजाच्या मुख्य राजधानीत कोणी पुरुष नाहीत अशी संधी पाहून त्याने अश्विन शुद्ध दशमीस प्रातःकाळी राजधानीत आपले सैन्य घेऊन प्रवेश केला. व तेथे त्याने सर्व अंगणाचे सोने लुटले. (त्याचा अपभ्रंश शिलंगणाचे सोने लुटिले हा होय.) आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला. वामन (ब्राम्हणाचा पुर्वज) त्यांच्या घरात शिरतेवेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी  (बहुजनांचा पुर्वज) थट्टेने घरात करुन ठेवला होता. त्यास तिने दाराच्या उंब-यावर ठेवून ती वामनाला अशी म्हणाली, की हा पहा बळी पुन्हा तुमच्याशी य़ुद्ध करण्यासाठी आला आहे. यावर वामन त्या कणकीच्या बळीलाथ मारुन घरात शिरला. त्या दिवसापासून विप्रांच्या (ब्राम्हण) कुळात दरवर्षी अश्विनमाशी विजयादशमीस  त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदळाचा बळी दाराच्या उंब-या बाहेर करुन ठेवलेला असतो. त्याच्या उरावर डावा पाय ठेवून ते आपट्याच्या काडीने त्याचे पोट फाडतात. नंतर त्यास उलंघून घरात शि्रतात. अशी वहिवाट सापडते...
बळीराजाचा सेनापती बाणासूर,,हा बाणाईचा बाप व मल्हारी मार्तंड जेजुरीच्या खंडोबाचा सासरा होता. हे बाणासूराचे लोक (बहुजन) तेव्हापासून अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरी गेले. तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी यापुढे दुस-या बळीचे राज्य येवो म्हणून प्राथर्ना करतात. महिला ओवाळताना ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. असे म्हणत ओवाळतात. त्या दिवसापासून शेकडो वर्षे लोटली. तथापि बळीच्या राज्याच्या कित्येक भागातील महिला क्षत्रिय वंशातील स्त्रिया दरवर्षी पती व पुत्रास दशमीला ओवाळताना बळीचे राज्य येण्याची इच्छा अद्याप व्यक्त करतात...यावरुन बळीराजा किती उत्तम असेल..धन्य तो बळीराजा आणि धन्य ती राजनिष्ठा...

दशरथ यादव, पुणे (संदर्भ- गुलामगिरी-महात्मा फुले)

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

कवितांची मैफल


शिवधर्मगाथा
जिजाऊ शिवाचा। आहे जो बछडा।।
तोचि रे फाकडा। शिवधर्मी।।१।।
शिवधर्म मूळ। शिवबाचे कूळ।।
जिजाऊ राऊळ। सिंदखेड।।२।।
जात पात नाही। देवपूजा सोडा।।
भटाची ना पिडा। औषधाला।।३।।
सिंदखेड राजा। शिवधर्म पीठ।।
चालू केली वाट। गौतमाची।।४।।
आपुला तो आहे। खरा शिवधर्म।।
पूर्वजांचे वर्म। कळो येई।।५।।

दशरथ यादव, पुणे







आठवण


आठवण येते सखे
किती सोसू मी गं घाव
पंख लावी मन माझे
तुझ्याकडे घेते धाव

गुलाबाचे रान तुझे
काट्याची गं येते कीव
वाट तुझी पाहाताना
कासावीस होतो जीव

हरवून जातो कधी
आठवांच्या झुंबरात
शोध तुझा घेत घेत
उतरतो अंधारात

समजावता मनाला
वाटे हा आभास
ओठातून येती माझ्या
गोड गाणी ही उदास

तुझी ओढ बघ सखे
कशी छळते जीवाला
मुक्यानेच रडे मन
कधी कळणार तुला

दशरथ यादव, पुणे







वारीच्या गावात


माझ्या वारीच्या गावात
रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई

माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात

दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात

गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो

विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो

माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं

वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले

भगवी वस्त्रे गुंडाळून
सूर्य दर्शनाला येतो
माझ्या गावाच्या चरणी
माथा रविकरांचा टेकतो

विठ्ठलही रोज इथं
मुक्कामाला येतो
पहाट होण्या अगोदर
गाव उचलून नेतो

दशरथ यादव, पुणे —






शंभुराजे


फसवलंय तुम्हाला शंभुराजे याचा लागलाय सुगावा
औरंग्याच्या डोळ्यात पाणी दुसरा कशाला हो पुरावा ॥धृ॥

श्‌ऊशी नव्हतीच लढाई तुम्ही परंपरेशी लढलात
भीम पराक्रमाने तुमच्या सगळा गनिमही झुरावा ॥१॥

लढाया जिंकल्या तुम्ही पण कागदावर हरलात
भटाळलेल्या लेखण्या बदलून सांधावा लागेल दुरावा ॥२॥

सांगा कसं म्हणू तुम्हाला आता धर्मवीर आम्ही
धर्मानेच केला घात, कपटाने काढला कुरावा ॥३॥

आनंदासरु आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे
शिरच्छेद तुमचा व्हावा, धर्माचा कोंबडा आरावा ॥४॥

देवाची खाऊनी भाड हिजड्यांनी केला कावा
नामर्दाचा अंश अजून इथल्या मातीत उरावा ॥५॥


दशरथ यादव, पुणे —







सह्याद्रीच्या सुता


बारामती ग्राम। जन्मला शरद।
विकासाला छेद। हिमालय।।१।।
वारसा तुकाचा। फ़डकवी झेंडा
मोडोनिया बंडा। अन्यायाच्या
दिलीश्वर झुके। मराठीचा बाणा
शिवराय राणा। आपोआप

बहुजन मं‌‌तर। आळविला त्यांनी।।
सगळा धावला। वारकरी ।।१।।
तुकाराम नामा फुले आणि बाबा।।
छ्‌पती शाहू । अभ्यासला।।२।।
आधुनिक तं‌ । शेतीत भरलं।।
धन वाढविलं । खळ्यामाजी।।३।।

विळखा शेतीला । कर्जाचा बसला।।
अस्वस्थ झाला। भूमिपूतर ।।१।।
करी कर्ज माफ । सोडविता फास।।
कुणब्याचा कस। जागवला।।२।।
पिकवले धान्य। अडवून पाणी।।
फुल्यांची वाणी । शिवरात।।३।।

साखळी तोडून। केलं स्‌ईला मुक्त।।
आर्‌क्सन दिलं। घरोघरी ।।१।।
कुणबी काबाड । फासात अडला।।
तिढा सोडवला। सावकारीचा।।२।।
कतृर्तत्वाने सा-या। दिशा उजळल्या।।
ज्योती पाजळल्या। प्रतिगामी।।३।।


शरदाचे भाळी। पसरे चांदणे।।
शेतीचे अंगण। गोंदियेले ।।१।।
शिवाजी शंभूचे। वारस हो तुम्ही।।
मराठ्याचा धर्म। जागविला।।२।।
जाणता हो राजा। आपण झालात।।
कतृत्व जगात। दाखवूनी।।३।।

सह्याद्रीचा सिंह। शेती शिक्शा तं‌तर।।
अवकाशी मंतर। जागवला ।।१।।
जगामाजी नेला। माझा महाराष्ट्र।।
पुरोगामी राष्ट्र। घडविले।।२।।
फुले शाहू बाबा । वाकविती नभा।।
विचारांचा गाभा। जपियेला।।३।।

शारदा मातेचा। पूतर पराक्रमी।।
विकासाची हमी। जनतेला ।।१।।
सत्य शोधकाचे। जुनेच घराणे।।
म्हणून धिराने । बोलतसे।।२।।
काटेवाडी गाव। कुणाला ना ठावे।।
भले भले राव। भेटलेना।।३।।


हिमालय बोले। सह्याद्रीशी गुज।।
व्हाना तुम्ही राजं। भारताचं ।।१।।
नभ पेलण्याची । ताकद तुमची।।
उगीच आमची। परीकशा।।२।।
सह्यद्रीच्या सुता। तुला दंडवत।।
राजाराम पुत। बोलियेला।।३।।


मुख्यमंतरी झाले। शरद पवार।।
किती हो सत्कार। गावोगावी ।।१।।
यशवंतराव । गुरुशिष्य जोडी।।
उभी केली गुडी। विकासाची ।।२।।
शिवाचा वारस। शोभती साहेब।।
फुकाचा गजब। सनातनी ।।३।।

संगणक ज्ञान। शेती करा छान।।
जपी मनोमन । सहकार।।१।।
ऐंशी टक्के जपा। समाजकारण।।
करा राजकारण। उरलेले ।।२।।
वेळ आणि शिस्त पाळायची हमी
घेतली ना तुम्ही आम्हाकडे।।३।।

क्रिकेट कबड्डी। कुस्तीत आभाळी।।
जगाला भुपाळी। शिकवली।।१।।
भाषण तुमचे । आम्हा मिळे ज्ञान।।
होती कीती जन। सज्ञान।।२।।
पोलिसांचा वेष । बदलला तुम्ही।।
जना दिली हमी। संरकशन।।३।।


तरुणांनी यावे। उद्योजक व्हावे।।
जनलोका द्यावे। समाधान।।१।।
काय सांगू तुम्हा। सागाराची खोली।।
मोजता न आली। कुणालाही।।२।।
हिमालय पडे । फिका तुम्हा पुढे।।
राशीवर राशी। कतृत्वाच्या।।३।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१ —







पुरंदर


क-हाकाठी मातीतून
घुमतो एक पुकार
मर्द मराठ्यांनी इथे
गाजवली तलवार

उसळून कोसळे वीर
मुरारबाजी हा थोर
कारकुड किल्लेदार
बेंगळे मानीना हार

किल्ल्यावर होते
मावळे चिमूटभर
ढासळले हे दगड
सपासप केले वार

ध़डाडून पडल्या तोफा
दिलेरखान झाला गार
हर हर गर्जनेने
शत्रू भेदला आरपार

अभेद्य होता पुरंदर
वज्रगड त्याच्या आड
शत्रू कापी चराचरा
मोगलांची मोडे खोड

शिवशाही बीज इथे
मातीत रुजली खोल
शंभू शिवाचा हा छावा
बोलतो बोबडे बोल

लढताना हो पडला
बाजी पासलकर
गरगरा फिरे पट्टा
गोदाजी करी कहर

दौलत मराठ्यांची
पानीपतात गेली
बेईज्जत महाराष्ट्राची
यो पेशवाईत झाली

कुंजीर कामठे माने
जाधवराव पोमण
जगताप खेडेकर
इंगळे काळे रोमण

५२ सरदार इथले
अटकेपार लावी झेंडे
पुढे जानोजी भिंताडा
लढे मानाजी पायगुडे

मातीला इथल्या येतो
गंध या इतिहासाचा
द-या खो-यातून घुमतो
आवाज शिवशाहीचा

क्रांतीवीर उमाजीनं
इंग्रज केला हैराण
या कडेकपारीतून
त्याचं उठवलं रान

बुलंद बाका पठारी
मंदिरे शिवाची सात
सात गडांचा पहारा
खडाच नऊ घाटात

भंडा-यात न्हाला गड
पैलतीरी भुलेश्वर
क-हा घेऊन कवेत
नांदतो पांडेश्वर

रामायण लिही वाल्ह्या
घडवून चमत्कार
म्हस्कोबा गुलालाने
रंगवितो गाव सारे

भिवरी बोपगावाला
कानिफनाथांचा वास
पोखर नारायणपूरला
दत्त मंदिरी आरास

मराठी पिळाची पगडी
गडकोट बहारदार
स्वाभिमानी हा बाणा
माझा जपतो पुरंदर

सोपानाने शेवटचा
श्वास इथेच घेतला


घे-यातल्या मावळ्यांनी
छातीचा केलाय कोट
चिव्हेवाडीनं धरलं
काळदरीचे हे बोट

पानमळा बागाईत
वीर परिंचे खो-यात
सीताफळ अंजिराने
गु-होळी राजेवाडीत

छत्रपती शिवाजींचा
उद्धार फुल्यांनी केला
कुळवाडी भुषण ऱाजा
सांगितला हो जगाला

बेलसर व नाझंर
क-हामाईची लेकर
दिवे,सोनोरी माहूर
गडाचे किल्लेदार

नीरा क-हेच्या खो-यात
असा इतिहास घङला
कुणब्यांनी इथल्या
दुष्काळ मातीत गाडला

पुरंदराच्या मातीत
निसर्गाची नवलाई
फळे फुले पालेभाज्या
इथे पिके आमराई

क-हाकाठाची मंदिरे
खुणावती पुन्हा मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे तुला

पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा

दशरथ यादव, पुणे


गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

संतभार पंढरीत

वारी पंढरीची  लेख ...

दशरथ यादव, पुणे
(संत साहित्याचे अभ्यासक)
मो. ९८८१०९८४८१ 

                    संतभार पंढरीत

                                                  ---------------- ------------                    


पंढरीची वारी आहे माझ्या घरी
आणिक ना करी तीर्थयात्रा

महाराष्टाच्या मातीत उमललेला...प्राचीन इतिहासाचा प्रभावाने प्रेरित होऊन समाजाला जगण्याचे बळ देत नेमकी वाट दाखविणारा भागवत धर्म (वारकरी पंथ) मराठी माणसांच्या मनामनात घर करून राहिला आहे. पंढरीची वारी हे शब्द कानावर पडले तरी समोर चित्र उभे राहते, ते भगव्या पताका खांद्यावर घेऊन, गळ्यात तुळशीची माळ, भाळी चंदनाचा टिळा, हाती टाळ व मुखी विठूनाम घेत पायीवारी करणारे हजारो वारकरी. साधी राहणी, प्रमाणिकपणा, शुद्ध आचार, शुद्ध विचार, एकच देव, जात नाही, पात नाही, उच्चनीच भेद नाही. असा भोळाभाबडा वाटणारा वारकरी हाच भागवत संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे. मराठी माणसांच्या मनात प्रचंड प्रेम व जिव्हाळा वाटणारा हा वारकरी संप्रदायाची नाळ जुळली जाते ती तथागत गौतम बुध्दांशी. खंडित झालेला बुद्ध विचार वारकरी संप्रदायाच्या रुपाने पुन्हा सुरु झाल्याचे समाधान येथील बहुजनसमाजाचा चेहऱ्यावर जाणवते. पांडुरंगाचा प्राचीन परंपरेचा व उगमाचा शोध घेत काम करणार्या संशोधकांनी विठ्ठल ही पूर्वीची बुद्ध मुतीर्ती असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
सिद्धार्थाचे चेले। वारीचे मावळे।
हाकली कावळे। सनातनी।।
वारकरी माझा। शेतकरी राजा।
मावळा शोभतो। शिवाजींचा।।
वारकरी संप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ असलेले संत नामदेव महाराज यांनी संतविचार देशभरात नेऊन पोचवला. संत चोखामेळा, संत नरहरी, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, या संताच्या बरोबर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदाय स्वीकारून समाजात जागृतीची प्रयत्न केला. मात्र संत नामदेवांच्या नंतर संत तुकाराम महाराजांनी कीतर्तनातून वारकरी संप्रदाय कळसावर नेला. वारीची परंपरा तशी जुनी असली तरी त्याला फारशी प्रसिद्धी व  व्यापकता नव्हती. संत तुकारामांचे चिरंजीव तपोनिधी नारायणबाबा यांनी वारीली सोहळ्याचे स्वरूप दिले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पादूका रथात ठेवून वारी करण्याची सुरवात नारायणबाबा यांनीच केली. सुरवातीला ते  देहूतून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवत व आळंदीला येऊन संत ज्ञानेश्वरांच्या पादुका त्यात ठेवत व पंढरीला जात. ही परंपरा अनेक दिवस  सुरु होती. ती देहुकर व आळंदीकर याच्यात मतभेद झाल्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे सरकार यांच्या पदरी असलेले सरदार हैबतबाबा अरफळकर(पवार) यांनी वारीला सामुहिक स्वरुप देऊन सुरवात केली.

वारीची वाट

संपत्ती सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ।।
होतील संतांच्या भेटी ।
सांगू सुखाचिया गोष्टी ।।
पंढरीच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून अनेक संतांच्या पालख्या वारकरी भक्तिभावाने काढतात व टाळ-मृदंगाच्या तालावर संतांचे अभंग गातनाचतगर्जत ते पंढरीची पायी वाटचाल करतात. या सकल संतांच्या पालख्यांमध्ये श्रीक्षेत्र आळंदीहून निघणारी संत ज्ञानदेवांची आणि श्रीक्षेत्र देहूहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी या प्रमुख मानल्या जातात. हे पालखी सोहळे म्हणजे श्रद्धा भक्तीचे वार्षिक जनजागरण आहे.
ज्येष्ठ "वद्य सप्तमीआणि "अष्टमीया तिथींना वारकरी भावविश्र्वामध्ये एक विशेष महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमीला श्रीक्षेत्र देहूतून संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे पंढरीच्या वारीसाठी "प्रस्थानठेवले जातेतर ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानोबांच्या पालखीचे प्रस्थान होते. या प्रस्थानास वारकरी भाविकांनी सोहळ्याचे रूप दिलेले आहे. हे दोन पालखी सोहळे म्हणजे स्वर्गीय आनंदाचा शद्बातीत अनुभव देणारे अनुपम सोहळे आहेत. कानालामनाला आणि चित्ताला एकाच वेळी अतिंद्रिय अनुभवाची प्रचिती देणारे हे नामभक्तीचे सुख सोहळे आहेत. "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।हा अभंग चरण संतांचे केवळ काव्य नव्हे तर अनुभवाचेप्रचितीचे कृतार्थ उद्‌गार आहेत.
ज्येष्ठ महिना लागला की वारकऱ्यांना पंढरीचे - विठुरायाचे वेध लागतात आणि कोणी न बोलविता वारकऱ्यांची पावले आळंदीदेहूच्या दिशेने वळतात. प्रपंचातल्याउद्योगधंद्यातल्याशेतीतल्या नेहमीच्या अडचणी दूर ठेवून एका अनामिक ओढीने वारकरी भाविक देहू-आळंदीला जमतात. वारकऱ्यांचा महासागर जमतो. टाळ-मृदंगाच्या नादानेनामघोषाने इंद्रायणी नदीचा तीर दुमदुमून जातो. वारकऱ्यांच्या मनात ओढ असते ती पंढरीच्या पांडुरंगाची -आषाढी वारीचीपण ते थेट पंढरपूरला न जाता देहू-आळंदीला येतात. कातर आळंदीहून ज्ञानोबाराय व देहूहून तुकोबाराय हे सुद्धा पंढरीच्या आषाढी वारीला येतातअशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्ञानोबा माऊलीच्यातुकोबांच्या सोबत पंढरीची वारी करायची म्हणून वारकरी थेट पंढरपूरला न जाता प्रथम आळंदी-देहूला जमतात.
श्री हैबतबाबा यांनी स्वतंत्ररित्या आळंदीहून ज्ञानदेवांचा पालखी सोहळा काढण्याचे ठरविले आणि त्यासाठी औंधचे संस्थानिक, (हैबतबाबांचे जुने मित्र) सरदार शितोळे (अंकलीजि.बेळगाव) यांच्याकडून घोडेपालखीअब्दागिऱ्याछत्री असा सर्व सरंजामी लवाजमा मिळवला आणि भजनासाठी ह.भ.प. खंडुजीबाबाह.भ.प. विठोबादादा वासकर अशा वारकरी फडकऱ्यांचेप्रमुखांचे सहकार्य घेतले आणि अशा प्रकारे साधारणत: इ.स.1823 साली आळंदी-पंढरपूर ज्ञानदेव पालखी सोहळ्याला सुरवात झाली.

दाटले आभाळ। टाळांचा पाऊस।।
वीणेची झंकार। सरीतून।।१।।
भगवी पताका। गजर्जतो आषाढ।।
पंढरीची वाट। ओलीचिंब।।२।।
भेटण्या अधीर। झाले माझे मन।।
उरकेना वाट। पांडुरंगा।।३।।
 अशी मनोमन ओढ लागलेले वारकरी पायीवारीने पंढरीला निघतात. कुठे मनात घरच्या कामाचा लवलेशही नसतो. सुगीचे दिवस, पेरणी व मुलांच्या शाळांचा प्रवेश अशी धांदल असताना येणारा हा उत्सव कीती मोठ्या मनोभावे साजरा केला जातो.
पंढरपूरला पायी वारीने जाणारा वारकर्यांचां हा लवाजमा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या बरोबर दरवर्षी लाखो वारकरी टाळमृदंगाच्या निनादात नाचत हरिनामाचे स्मरण करीत मजल दर मजल करीत निघतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. एवढा जनसमुदाय गुण्या गोविंदाने वारीत चालतो, याचे गमक जाते संताच्या मनोवृतीला व त्यांनी घालून दिलेल्या नियोजनला. वारकर्यांचे मोठ्या मनोभावे स्वागत ग्रामस्थ करतात. पंढरीच्या वारकर्यांची सेवा करून आनंद घेण्याची प्रथा जुनीच आहे. एवढा मोठा वारीचा हा गाव चालतो तरी कसा. त्याचे काय गमक आहे, याचे  कुतूहल मराठी माणसांना जसे आहे तसे परदेशी अभ्यासकांनाही वारीने भुरळ पाडली आहे.
वारीच्या गावात

रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई

माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात

दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात

गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो

विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो

माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं

वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले
असाच भाव प्रत्येकाच्या मनी असतो. वारीचे हे भावविश्व मनाला रुंजी घालते. मोठ्या आदराने माऊली...माऊली..म्हणत इतका लडिवाळपणा व आपुलकीचे बोलणे फक्त इथेच अनुभवास येते. विज्ञान युगातही बदलाच्या उंबरठ्यावर टिकून राहणारा हा पंथ काही वेगळाच आहे. याची जाणीव झाल्यशिवाय राहत नाही. देहु व आळंदीतून पायीवारीने निघालेला वैष्णवांचा मेळा दिंडया दिंडयातून नाचत गात प्रवचन, भजन म्हणत पुढे सरकतो. ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा ते बाळगत नाहीत. सावळ्या विठूरायाच्या दशर्शनाच्या ओढीने हा गाव चालत चालत निघतो. पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, वेळापूर मार्गे पंढरीला पोचतो. वारीची वाट म्हणजे काय चमत्कार आहे, अशी भावना अनेकांच्या मनात येते, महिला, मुले, वद्ध, सगळेच खूष असतात.
वारीचे व्यवस्थापन
वारीची रचना पाहिली तर लाखो  लोक चालतात, मुक्काम  करतात, जेवणे होतात, हा सगळा लवाजमा व याचे नियोजन कसे होते, हे आश्चर्य आहे, कुठे ही फारसी सोय नसताना व अडचणीवर मात कशी करायचे ही वारी शिकवते. स्वावलंबनाचा मंत्र येथे मिळतो. समाजात कसे वागावे हेही कळून येते. दिंड्याचे शेकडो ट्रक, जीप, व वाहने सामान वाहून नेतात. मुक्कामाच्या राहुट्या, जेवणाचे साहित्य, स्वयंपाक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर वारी काय आहे याचा उलगडा होईल. व्यवस्थापनशास्त्र वारीने जगला सांगितले हे समजून येईल व शिकायलाही मिळेल. वारीच्या एकेका पैलूवर अभ्यास करून खूप काही शिकण्यासारखे आहे.

संतभार पंढरीत।  कीर्तनाचा गजर होत।
तिथे असे देव ऊभा। समचरणाची शोभा।।
असा भाव वैष्णवांच्या मनात पंढरीत आल्यावर येतो. देहू व आळंदीहून पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूर आल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुन्हा पाय घराकडे वळू लागतात. पण वारीच्या प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, जीवाभावाची जमलेली गठ्ठी सोडून जाताना मनाला हूरहूर वाटत राहते. पण विठ्ठल भेटीचे फळ पदरात पडल्याने जे समाधान मिळते ते काही औरच असते. या सगळ्या अनुभवाची शिदोरी मनात साठवून मिळालेले जगण्याचे बळ पुन्हा पुढ्च्या वारीच्या तयारीत रमते. पंढरी सोडून जातानाची हुरहुर ही मनाला भावते. चंद्रभागा स्नान, टाळांची छनछन, वीणेची झंकार, फ़डफडणार्या भगव्या पताका, नाचणारे पाय, उन्हाचा चटका, पावसाचा शिडकावा, दणाणून गेलेला परिसर, वाटेतील रिंगणे...पालखीरथाचा कळस....अश्वाची दौड, राहुट्याच्या महालातील रंगलेली भजने, चोपाची शिस्त, समाजारतीचा जल्लोष, टाळांची छनछन कानातून जात नाही. या सगळ्या गोष्टीचा पट उलगडत उलगडत मन आठवणींच्या वारीत पुन्हा रमुन जाते.

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

चौफुला जुगलबंदी.

बबन पाचपुते वारीत

वाखरी रिंगण

वारीचे अंकरिग

दशरथ यादव निवेदन

विजय कदम मुलाखत

उषःकाल सिनेमा गीत

सयाजी शिंदे मुलाखत

निशा परुळेकरची मुलाखत..

सोलापूर संमेलन ग्रंथदिंडी

नवोदित संमेलनातील भाषण

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

आचार्य अत्रे

                                आचार्य अत्रे

---------------
क-हाकाठचे साहित्यरत्न
-----------------
लेखक- दशरथ यादव


मराठी साहित्यक्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असे अचाट काम करणारे साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे (इ.स.१३ आॅगस्ट १८९८ - इ.स१३ जून १९६९) यांचे मूळ गाव कोडीत. पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते व पहिले आमदार बापूसाहेब खैरे यांचेही तेच मूळ गाव. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली पराक्रमाचा वारसा जतन करणारा पुरंदर किल्ला सोबतीला. संत सोपानदेव व छत्रपती संभाजीमहाराज यांच्या रुपाने साहित्याचा प्रवाह क-हेतून सदैव खळखळत आहे. शौर्य, पराक्रम, अध्यात्माचा वारसा अंगाखांद्यावर खेळवीत दिमाखात उभ्या असलेल्या शिवशंभुच्या पुरंदराची प्रेरणा हीच आचार्य अत्रे यांच्या लेखनाची ताकद आहे.
आचार्य अत्रे हे वक्ता, पत्रकार, लेखक, चित्रपटकार, विडंबनकार, शिक्षणतज्ञ, नाटककार, राजकारणी यासगळ्या क्षेत्रावर त्यांचा प्रभाव होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक नेते म्हणूनही त्यांनी प्रभाव पाडला होता.

आल्याड क-हा अन पल्याड नीरा
हा शिवशाहीचा झरा रं
शिवशंभूचा पुरंदर म्हणजे
मोतियाचा तुरा रं
अशी महती असणारा पुरंदरचा क-हा पठार हा सह्याद्री पवर्वताच्या दोन समांतर रांगाच्या मधल्याभागात व्यापून गेला आहे..पुरंदर किल्ल्याच्या पुर्वेला जाणारी एक पर्वत रांग जेजुरीच्या खंडोबाच्या कडेपठारगडापर्यंत जाते. दुसरी रांग बोपदेवघाट, दिवेघाटापासून पुवेला भुलेश्वर मंदिरापर्यंत जावून लोप पावते. या रांगेवर मल्हारगड, ढवळगड व दौलतमंगळगड हे तीन किल्ले तसेच कानिफनाथाचेही मंदिर आहे. क-हाकाठावरील ५२ सरदारांच्या जीवावर पेशवाई तगून होती.

चित्रपट व पत्रकारिता

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.
इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले. १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

साहित्यलेखन

क-हेचेपाणी हे पाचखंडातील आत्मचरित्र, चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन केले. झेंडूची फुले व गीतगंगा हे कवितासंग्रह लिहिले. अशा गोष्टी अशा गंमती, कशी आहे गम्मत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके लिहिली. अध्यापक अत्रे, आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो?
मुद्दे आणि गुद्दे, वस्त्रहरण
तसेच विनोद गाथा लेखन केले. विनोबा, संत आणि साहित्य, समाधीवरील अश्रू, सिंहगर्जना, सुभाष कथा, सूर्यास्त, हंशा आणि टाळ्या, हुंदके या पुस्तकांबरोबर नाटकांचेही लेखन केले. अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला-विडंबन, कवडीचुंबक, गुरुदक्षिणा,
घराबाहेर, जग काय म्हणेल?, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कावळा, पाणिग्रहण, प्रल्हाद(नाटक), प्रीतिसंगम (नाटक), बुवा तेथे बाया, ब्रम्हचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे,मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वंदे भारतम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट, सिंह, साष्टांग नमस्कार.

नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. मुंबई येथे  त्यांचे निधन झाले. सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी. ए., बी. टी., टी. डी. पर्यंत शिक्षण. नंतर पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. तेथे असतानाच राजा धनराज गिरजी हायस्कूल (१९२७) व मुलींचे आगरकर हायस्कूल (१९३४) या शाळांच्या संस्थापनेत भाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. १९३३ पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. १९३९ नंतर मुंबईला स्थलांतर. १९४० त सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावासायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.

प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे विशेषत: ‘रविकिरणामंडळा’ चे कवी व त्यांच्या कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.

महात्मा जोतिबा फुले






क-हाकाठचे साहित्यरत्न


                                     महात्मा जोतिबा फुले 


                                             लेखक -दशरथ यादव, पुणे

----------------------
महात्मा फुले (इ.स.१८२७ - नोव्हेंबर २८ १८९०) हे मराठी, भारतीय समाजाचे आधुनिक समाजसुधारक होते.
त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे जमिनीचा सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. सासवडपासून सात किलोमीटर अंतरावरील खानवडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे तेथे घर होते. जमिन होती. अजूनही त्यांच्या नावाने सातबारा तिथे पाहायला मिळतो.

तुकारामांचा प्रभाव
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सामाजिक प्रबोधनासाठी तुकारामांनी अंभग रजना केली त्याच अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पिढ्या न पिढ्या पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली शिवजंयती महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन साजरी केली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधिचा शोध त्यांनी लावला. समाधीची पूजा केली..रयतेचे राज्य उभे करणा-या शिवाजीराजांवर त्यांनी कुळवाडीभूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिला. सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात समाजात जागृती करण्याचा चंग बांधून त्यांनी समाजाच्या हातातील मनुस्मृतीची बेडी तोडण्यासाठी मोठे कष्ट घेतले. प्रारंभी समाजातील लोकांनीच त्यांना अज्ञानातून विरोध केला. पुण्यातील ब्रम्हणांकडून जोतीरावांचा खूप छळ झाला. पण ते डगमगले नाहीत.

मुलींची पहिली शाळा
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा येथे झाला. इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले. इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह झाला. इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले. इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला. इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना केली. मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी, रात्रशाळा, मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न, विधवाविवाहास साहाय्य, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप, गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला, हौद अस्पृश्यांसाठी खुला, सत्यशोधक समाजची स्थापना, शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले, स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य, पुणे नगर पालिकेचे सदस्य, दारू दुकानाना विरोध, पहिल्या कामगार संघटनेची स्थापना, 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी, सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणले.

महात्मा फुले यांचे साहित्य

मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे त्यांचे निधन झाले.
 महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रंचड गाजले.
तृतीय रत्न नाटक -इ.स. १८५५
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा- पोवाडा इ.स. १८६९
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह- इ.स. १८६९
गुलामगिरी लेखसंग्रह- इ.स. १८७३
शेतकऱ्यांचा आसूड- लेखसंग्रह इ.स. १८८३
सत्सार नियतकालिक- इ.स. १८८५
इशारा लेखसंग्रह- इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह- इ.स. १८८९

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
   नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
   वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

महात्मा फुले यांचे घराणे, फुलमाळ्यांच्या धंद्यातील कसबामुळे, पेशव्यांचे आश्रीत आणि इनामदार होते. या सुखवस्तू माळी कुटूबांत त्यांचा जन्म झाला. १८३४ पासून १८४७ पर्यंत पहिली १३ वर्षे त्यांची शिक्षण घेण्यात गेली. त्यांचे शेजारी गफारबेग मुनशी आणि लिजिटसाहेब या दोघांचा या तरतरीत तडफदार चौकस मुलावर लोभ होता. त्यांच्यापासुन मुस्लिम आणि ख्रिस्ती या दोन धर्माची माहिती मिळाली, त्यामुळे हिंदूधर्मातील अमानुष विषमता आणि नाना प्रकारच्या दुष्ट रुढी यांचे ज्ञान झाले. सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर आणि सखाराम यशवंत परांजपे हे तीन ब्राम्हण विद्यार्थी मित्र. बायबलपासुन ते थॉमस पेन यांच्या,"राईटस ऑफ मॅन " या क्रांतीकारक ग्रंथापर्यंत इंग्रजी वाङमयाचा व्यासंग विद्यार्थी असतानाच जपला. गुरुजी लहूजीबाबा यांच्या तालमीत असताना "दयाळू इंग्रज सरकारला पालथे घालण्याकरीता", दांडपट्टीची आणि निशान मारण्याची कसरत ते शिकले. राज्यक्रांतीच्या कल्पनाही त्यांच्या डोक्यात येऊन गेली. १८२६ उमाजी नाईकांच्या दंग्यापासून तो १८४८ मधील राघोजी भांग्रे यांच्या दंग्यापर्यंत महाराष्ट्रात त्या वेळी अनेक दंगली होउन गेल्या होत्या. पण धर्मांतराच्या वेडाप्रमाणे हे 'वेडाचार' ही त्यांच्या डोक्यातून लवकरच निघून गेले.
        रंजल्यागांजलेल्यांना साहाय्य करणे हा आपला धर्म ते मानीत, म्हणून खुद्द महात्मा गांधीजींनी - जोतीबांना 'खरा महात्मा' असे संबोधले आहे. जोतीरावांनी बोलीत आणि कृतीत विसंगती आणू दिली नाही. प्रत्येक वेळी ते कसाला उतरले आहेत.
बालविधवांना मदत
 नैसर्गिक मोहाला बळी पडलेल्या बालविधवांना व त्यांच्या अपत्यांना जाहीर संरक्षण देऊन संगोपनासाठी आश्रम काढले. त्या आश्रमात २००० बालकांची सोय केली. स्त्रियांना शिक्षण मिळाल्याखेरीज देश शिक्षित व सुसंस्क्रुत होणार नाही, कुटुंबाची सुधारणा होणार नाही, हे जाणून स्त्रियांना शिक्षण देण्याकरीता जोतीरावांनी शाळा काढली. हिंदूस्थानातील ती पहिली शाळा.
अस्पृशांची शाळाही महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात त्यांनीच प्रथम काढली. मुलांना पाणी प्यायला मिळेना म्हणुन स्वत:चा हौद खुला ठेवला. पण शाळेत शिक्षक मिळेनात, म्हणून जोतीरावांनी सावित्रीबाइंना शिकवून तयार केले व शिक्षिका बनवले. त्यांनाच दमदाटी देऊन, सावित्रीबाईंची टिंगल करून, दगड मारून शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न सनातनी ब्राम्हणांनी केला. त्यामुळे ते दांपत्य काही डगमगले नाही. तेव्हा त्यांना ठार मारण्याकरीता त्यांच्यावर मारेकरी घातले. ते मारेकरी मारण्यासाठी आले असताना जोतिरावांनी त्यांना विचारले,”काय रे बाबा, मी तर तुमच्यासाठी मरतो आहे आणि मला मारून तुमचा काय फायदा ?"त्यावर एक म्हणाला "आम्हाला एक हजाराचे बक्षिस मिळणार आहे ." “मग मारा तर!” म्हणून प्रतिकार न करता ते स्वस्थ बसले. या वाक्याने त्यांचा हृदयपालट झाला व शस्त्र टाकून ते त्यांच्या पायावर पडले. त्याला त्यांनी शिकवले व कुंभार हा पंडीत झाला. हे उदाहरण कोणाही महात्म्याला शोभण्याजोगे आहे .
त्यांनी केवळ सामाजिक व धार्मिक प्रश्नच हाती घेतले होते असे नाही. सर्व समाजातील थरांचा ते विचार करीत होते. मुंबईच्या मजुरांकडेही त्यांची दृष्टी वळली. मजुरांना १४ तास काम करावे लागे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच अवजड काम करावे लागे. मुलांनाही तेच त्रास होते. जोतीरावांचे सहकारी व अनुयायी लोखंडे यांनी मजुरांचा प्रश्न हाती घेतला. त्यांनी खास मजुरांसाठी पत्र काढले व मजुरसंघटना बनवली. महाराष्ट्रातील हिच पहिली मजुर संघटना होय.
जमिनीला बांध बांधून पाणी आडवावे, म्हणजे जमीन सुपीक होईल. धरणे बांधून नद्या आडवाव्यात. शेतकर्‍यांना कर्जमुक्‍त करावे. कमी रकमा देऊन गरज भागवावी, बी-बीयाणे औते, अवजारे पुरवावीत, उत्कृष्ठ जनावारांची पैदास करावी. उत्तम शेती करणार्‍यांना बक्षिसे द्यावीत. हे सारे विचार त्यांच्या लिखाणात आढळून येतात. खेड्यावरच्या निवडक हुषार मुलांना निवडून त्यांना अखेरपर्यंत शिक्षण मोफत द्यावे या कल्पेनाचाही पुरस्कार जोतीरावांनी केला होता.
त्यांनी विवाहबाह्य विधवेच्या मुलाला जवळ केले. त्याला फुले दांपत्याने पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले, त्याचे नाव 'यशवंत' ठेवले. आपल्या इस्टेटितला काही भाग त्याला तोडून दिला व ज्ञानोबा सासने नावाच्या आपल्या मित्राला त्याची मुलगी यशवंतला देण्याविषयी विनंती केली. त्या थोर चेल्याने ती मान्य केली.
सन १९८८ मध्ये ड्युक ऑफ कॅनॉट पुण्यास आले होते . जोतीरावांचे स्नेही हरी रावजी चिपळूणकर यांनी राजपुत्रासाठी एक मेजवानी आयोजीत केली आणि जोतिरावांना मेजवानीस आमंत्रित केले. जोतीराव मेजवानीस हजर राहीले पण गरिबीत दिवस काढणार्‍या शेतकर्‍याच्या वेषात. त्या प्रसंगी जोतिरावांनी इंग्रजीत भाषण करून शेतकर्‍यांची परिस्थिती कशी हलाखीची आहे ते राजपुत्राला समजावून दिले.