साहित्याची पायवाट

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

साहेब

साहेब

बांधावरच्या माणसाला आता
तुमच्यात देव दिसतोय
शेतीसाठी का व्हईना पण
तुमचाच जीव तुटतोय

गावातल्या सोनबाला बघा
तुमचं म्हणणं लय पटत
चार कोस सभा तरी
येतोना पाय आपटत

साहेब, शेतक-याच्या आत्महत्या
म्हणती साले फॅड झालया
मंदिर आणि मठांनी काय
समजाला कमी वेडे केलयं

रामाच्या नावावर जगणा-यांना
तुमची मोठी धास्ती आहे
सत्तेचं कुलूप खोलायला
त्यांच्याकडे कुठे चावी आहे

चुल आणि मुला पुरतीच
महिला आता सरपंच केलीत
महापौर, आमदारही झाली
सगळी पदे खुली केलीत

महिलांसाठी तुम्ही मोठं
बघा काम केलंया
संस्कृती साखळदंड तोडून
त्यांच्या हातांना बळ दिलंया

शिवबाचा शिवधर्म आता
तुम्हाला सांगावा लागेल
कृष्णाजी भास्कर सारखा
मनूवाद फाडावाच लागेल

फुले शाहु आंबेडकरांचा
महाराष्ट्र तुम्ही फुलवलाय
शिवरायांचा राष्ट्रवाद
मनामनात जागवलाय

कोण परदेशी कोण स्वदेशी
आता हेच ठरवावे लागेल
साहेब तुम्हालाही आता
मनातले बोलावेच लागेल

बारामतीच्या वैभवाने
मनुवाद्यांचे डोळे दिपतात
अंधा-या खोलीत जाऊन
काजव्या समोर बसतात

दशरथ यादव, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा