साहित्याची पायवाट

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

क-हेपठार

पुरंदर


क-हाकाठी मातीतून
घुमतो एक पुकार
मर्द मराठ्यांनी इथे
गाजवली तलवार

उसळून कोसळे वीर
मुरारबाजी हा थोर
कारकुड किल्लेदार
बेंगळे मानीना हार

किल्ल्यावर होते
मावळे चिमूटभर
ढासळले हे दगड
सपासप केले वार

ध़डाडून पडल्या तोफा
दिलेरखान झाला गार
हर हर गर्जनेने
शत्रू भेदला आरपार

अभेद्य होता पुरंदर
वज्रगड त्याच्या आड
शत्रू कापी चराचरा
मोगलांची मोडे खोड

शिवशाही बीज इथे
मातीत रुजली खोल
शंभू शिवाचा हा छावा
बोलतो बोबडे बोल

लढताना हो पडला
बाजी पासलकर
गरगरा फिरे पट्टा
गोदाजी करी कहर

दौलत मराठ्यांची
पानीपतात गेली
बेईज्जत महाराष्ट्राची
यो पेशवाईत झाली

कुंजीर कामठे माने
जाधवराव पोमण
जगताप खेडेकर
इंगळे काळे रोमण

५२ सरदार इथले
अटकेपार लावी झेंडे
पुढे जानोजी भिंताडा
लढे मानाजी पायगुडे

मातीला इथल्या येतो
गंध या इतिहासाचा
द-या खो-यातून घुमतो
आवाज शिवशाहीचा

क्रांतीवीर उमाजीनं
इंग्रज केला हैराण
या कडेकपारीतून
त्याचं उठवलं रान

बुलंद बाका पठारी
मंदिरे शिवाची सात
सात गडांचा पहारा
खडाच नऊ घाटात

भंडा-यात न्हाला गड
पैलतीरी भुलेश्वर
क-हा घेऊन कवेत
नांदतो पांडेश्वर

रामायण लिही वाल्ह्या
घडवून चमत्कार
म्हस्कोबा गुलालाने
रंगवितो गाव सारे

भिवरी बोपगावाला
कानिफनाथांचा वास
पोखर नारायणपूरला
दत्त मंदिरी आरास

मराठी पिळाची पगडी
गडकोट बहारदार
स्वाभिमानी हा बाणा
माझा जपतो पुरंदर

सोपानाने शेवटचा
श्वास इथेच घेतला


घे-यातल्या मावळ्यांनी
छातीचा केलाय कोट
चिव्हेवाडीनं धरलं
काळदरीचे हे बोट

पानमळा बागाईत
वीर परिंचे खो-यात
सीताफळ अंजिराने
गु-होळी राजेवाडीत

छत्रपती शिवाजींचा
उद्धार फुल्यांनी केला
कुळवाडी भुषण ऱाजा
सांगितला हो जगाला

बेलसर व नाझंर
क-हामाईची लेकर
दिवे,सोनोरी माहूर
गडाचे किल्लेदार

नीरा क-हेच्या खो-यात
असा इतिहास घङला
कुणब्यांनी इथल्या
दुष्काळ मातीत गाडला

पुरंदराच्या मातीत
निसर्गाची नवलाई
फळे फुले पालेभाज्या
इथे पिके आमराई

क-हाकाठाची मंदिरे
खुणावती पुन्हा मला
शिवशाहीचे तोरण
म्हणे बांधायचे तुला
          
पुरंदराच्या भूमीत
जन्म पुन्हा पुन्हा व्हावा
मातीने कणा कणात
इतिहास जागवावा

दशरथ यादव, पुणे

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

2) शाहिर सगनभाऊ

२) शाहिर सगनभाऊ


लेखक- दशरथ यादव,पुणे

----------------------


जेजुरीचे रहिवासी सगन 

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारुन उठतं. नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो. वैभवशाली इतिहासाबद्दल अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यामागील पराक्रमांच्या वर्णनाने भारावून जाते. शाहिरी संकल्पना अन्य भाषेतून घेतली असली तरी त्याचा गाभा अस्सल मराठीपणाने रसरसलेला आहे. शाहिरीतून अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. पेशवाईच्या काळात वीर रसाबरोबर शृंगार रसाचीही शाहिरीमध्ये भर पडली. श्रीमंत नानासाहेब पेशवे व दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात शाहिरीला राजश्रय मिळाला. उत्तर पेशवाईत मराठी शाहिरीला बहर आला. मराठी स्त्री पुरुषाच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाडःमय भरभरुन लिहिणारे, अनंतफंदी (इ.स.१७४४ ते१८९९), रामजोशी (इ.स.१७५८ते १८८३), शाहीर परशराम (इ.स.१७५४ते१८४४), होनाजी बाळा (इ.स.१७५४ते१८४४), प्रभाकर (इ.स.१७५२ते१८४३), सगनभाऊ (इ.स.१७७८ते१८५०) यांच्या जीवनासंबधी व त्यांनी लिहिलेल्या लावण्याबाबत मराठी माणसांच्या मनात कुतूहल व आकर्षण आहे.
शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठऱले. शाहीर सगनभाऊ मुळचे जेजुरी (ता.पुरंदर) येथील रहिवासी. वंशपरंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना व काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्याला गेले. नामवंत शाहिरांसोबत आपली कवने सादर करु लागले. थोड्याच कालावधीत यश व प्रसिद्धी मिळाली. सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनही ते मराठीशी महाराष्ट्राच्या  संस्कृतीशी एकरुप झाले होत. हत्यारांना धार लावण्याचा त्यांचा धंदा. पण पिढीजात धंद्यात विशेष रस नसल्याने शाहीरीत रमले. तो नाथसंप्रदायी असून, मराठी संत व हिंदू धर्म परंपरा याचा जाणकार होता.सिंधू रावळ हा नाथपंथी शाहीर त्याचा गुरु होता. आपल्या लावण्यांत तो विठ्ठल, पंढरी, ज्ञानेश्वर, जनाबाई, तुकाराम ह्यांचा उल्लेख अनेकदा करतो. दुस-या बाजीरावाचा त्याला आश्रय होता. त्याच्या विलासावर त्याने लावण्या रचल्या. होनाजीबाळाशी त्याची चुरस असे. सगनभाऊ उतम लावण्या लिहित. सगनभाऊंच्या अनेक लावण्या कमालीच्या शृंगारिक आहेत. तथापि त्या भेदिक आहेत. असा ही दावा करण्यात येतो.  त्याकाळात गवळ्याचा फड व रावळचा फड असे दोन फड पुण्यात होते. गवळ्याच्या फडाचा प्रमुख होनाजी तर रावळाच्या फ़डाचा प्रमुख सगनभाऊ होता.  होनाजीप्रमाणे त्यानेही रागदारीत रचना केली आहे.

कोथळे गावचा भाऊ गोंधळी

---------------------------
होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर यांना जसे एकत्रित होनाजी बाळा असे नाव मिळाले. सगन मुस्लीम धर्मीय होता. जेजुरीपासून पाच किलोमीटरवर क-हा नदीच्या काठावर असलेल्या कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे एकत्रित नामाभिधान झाले. जेजुरीकरांच्या मनात आजही सगनभाऊ बद्धल प्रेम व अभिमान आहे. जेजुरीत नोंव्हेंबर मध्ये सांस्कृतिक महोत्सवात ही रात्र शाहिरांची, लोकनाट्य, लोकसंगीत असे कार्यक्रम रंगविले जातात. भाऊ गोंधळी यांच्या गावी मात्र अजूनही त्यांचे भव्यदिव्य असे स्मारक नाही. लोकांना त्यांचा प्रेरणादायी इतिहास ज्ञात नाही. काही जणांच्या मनात स्मारक बांधण्याचा विचार आहे. त्याला मूर्तस्वरुप अद्याप आले नाही. सगनभाऊच्या  फडात गाणा-या पैकी राम गोंधळी हा उत्कृष्ठ आणि विशेष प्रसिद्ध होता. जेजुरीत खंडोबाचे भक्त म्हणून मुरळी व गोंधळी सोडण्याची प्रथा होती. हे भक्त म्हणजेच गोंधळी. ते खंडोबाची स्तुतीपर कवने रचून जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात धार्मिक विधीबरोबर लोकांचे मनोरंजनही करी. त्यातूनच ढोलकीफडाच्या तमाशातही ते काम करीत. मुरळी देव देवतांचे कार्यक्रम करी.
सगनभाऊनी हिंदू देवांवरही कवने केली आहेत.खंडोबावर त्यांची श्रद्धा होती.
प्रातःकाळी उठूनी गणपतीचे, करि विष्णू स्मरण
काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन
सोमनाथ सोरटी, बद्रिकेदार रामेश्वरी स्नान
श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वेरूळ मांधाता जाण.

शृंगारिक लावणी 

---------------------
सगनभाऊ यांच्या लावण्या आजही तमाशात व बैठकीत गायल्या जातात. रचना भावनोत्कट, प्रत्ययकारी वणर्णनांनी सजलेल्या असून, भाषा सहजसुंदर आहे. लावण्यातील शृंगारात नाजुकपणा व संयम अधिक होता. एकनिष्ठ, पतिव्रता, धर्मश्रद्धा, याबाबतचे हिंदूसंस्कार त्यामध्ये स्पष्ट दिसतात. अनंतफंदीपासून शृंगाराला सुरवात झाली. सगनभाऊच्या काळी रसिकतेने मर्यादा ओलांडली.बिभत्स,अश्लील, आडपडदा न ठेवता लावणीकार सर्व वर्णन करीत होते. त्यावेळी सगनभाऊनी शृंगारिक लावण्या रचल्या. स्वंतत्र, विचार मनोहार कल्पना यांची सांगड कवनात घातली. उतान शृंगार, डौलदार रचना, बैठकीच्या चाली यामुळे लावण्या लोकप्रिय झाल्या. त्यांनी लावणीतून मराठी राज्य व संस्कृतीचे दर्शन घडविले.
नाकी नथ हालती नागीन
डुलती शृंगाराचा काय नखरा,
किंवा
लाल भडक वेणी स़डक आति चमेली मधी भिजली।
गोरे गाल जपून जाल, मजा पहाल फाकडे।

अशा वर्णनाच्या लावण्या त्यांनी रचल्या.
  लावणीची जुनी परंपरा त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्ठात आली असे जुने लोक मानतात. सगनभाऊकृत लावणी व पोवाडा भाग १ संग्रह प्रकाशित आहे

पोवाड्यांची रचना

पेशवाई बुडाल्यानंत सगनभाऊ साता-याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंहाच्या आश्रयाला आल्याचे दिसते. प्रतापसिंहावर त्यांनी पोवाडे लिहिले. इंग्रजांनी प्रतापसिंहाना पदच्यूत केल्यानंतर त्यांची रवानगी काशीला केली. हा पोवाडा त्यांनी लिहिला आहे. ग्रामीण जीवनशैली त्यांची जी नाळ बांधली होती ती त्यांच्या शाहिरीतून दिसून येते. उत्तर मराठेशाहीतील सर्वात मोठी घटना, मराठ्यांच्या मनात असणारी सल म्हणजे पानिपतची लढाई,  या लढाईवर सगनभाऊनी प्रदीर्घ पोवाडा लिहून त्याकाळीतील परिस्थितीचे सुंदर भाष्य केले. खंडेरायावर त्यांची अपार श्रद्धा होती. देवदेवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले. हीच रचना खंडेरायाच्या भूपाळीमध्ये म्हटली जाते.
खडकीच्या लढाईवरील पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, पानिपतचा पोवाडा हे त्यांचे काही प्रसिद्ध पोवाडे.

दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी।
लेकराला माय विसरली, कसा ईश्वर तारी।

असे खडकीच्या लढाईचे अस्वस्थ करणारे वर्णन त्यांनी केले.


पानिपतची लढाई (पोवाडा)

भाऊ नाना तलवार धरून । गेले गिलच्यावर चढाई करून ॥ध्रुपद॥
सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर सवाई बाजीराव पेशवे पुण्यवान प्रधान । नाना भाऊ गादीवर शूर जन्मले जैसे अर्जुन ॥ शहर पुणे वसविले मोहरा पुतळ्यांला नाही काहि उणे । चमके नंगी तलवार सैन्य हे सारे लष्कर पाहून ॥ गर्व कोंदला फार जैसा लंकापती रावण । होणारासारखे अक्षर कैसे लिहिले ब्रह्माने ॥( चाल )॥ नामांकित सरदार थोर । नामे ऐका तपशीलवार ॥ बोलावून अवघे वजीर । सजवृनया सभा सदर ॥ मग कैसा केला विचार । लिहिली एकच तार ॥ अष्टप्रधान पानकरी सार । जरीपटकाऐंशी हजार ॥ गाईकवाड सैनापती भार ॥ भाला ऐंशी हजार होळकर । बारा हजार बाणांची कतार । चाळीस हजार भोसले नागपुरकर ॥ वीस हजार अरब सुमार । तीस हजार हपशी बरोबर ॥ आले मल्हारराव होळकर । फौजेमध्ये कुल अकत्यार । अठरापगड लोक सार ॥ आपल्याला भिसलीवर ॥( चाल )॥ चाळीस हजार पठाण नित्य तेघे चमकती । अर्बुज जात ही खंदी फिरे भोवती ॥ सिंध जाट रोहिला नाही त्याला गणती । घोरपडे नाईक निंबाळकर नौबद वाजती ॥ घाटगे मोहिते माने पाटणकर झुकती । ढालेशी ढाल भिडे जरीपटक्याचे हत्ती ॥ हे मानकरी भाऊचे ऐसे दुनया बोलती ॥ एक एकाबरोबर ऐसै पतके किती । चाळीस हजार सडक करनाटकची चमकती । बाराभाई जमले नाही त्यांची गणती ॥ सांडणीस्वाराची डांक फिरेभोवती ।..........॥ अशी जमाबंदी करून । भाऊ नाना ॥१॥

शाण्णव कुळीच भूपाळ सारे मानकरी बरोबर ॥ धायगुडे पायगुडे मोरे शेडगे पांढरे महाशूर ॥ खल्लाटे लोखंडे भिसे वाघमारे आणिक हटकर । शेळके बोळके काळे खचल खराडे नाही त्याला सुमार । शिरके महाडिक मिसाळ पिसाळ बोधे बरगे आहेत बरोबर । जाधव धुळप पोळ चवाण डफळे भोसले गुजर रणशूर ॥ लिगाडे कदम फडतारे घाडगे यादव थोरात भापकर । आंगरे इंगळे शेवाळे शितोळे रणदिवे वाबळे खळदकर ॥ गाढवे रसाळे जगताप जगदाळे काकडे काटकर । बोबडे ढुबल भोइटे लिंगाडे सांवत खिरसागर ( क्षीरसागर ) । गोडासे निकम दुधे फाळके धुमाळ गजरे वालकर तेरदाळकर । बागल कोकाटे कडमकर रणनवरे कालेवार आयरेकर ॥ हे सारे सुभे भाउचे उभे आपलाल्या बाजूवर ॥( चाल )॥ चाळीस हजार करवल जमले । सोडिले शिरावर समले ॥ रास्ते पटवर्धन नाही गमले । ढमढेरे तळेकर तुमले ॥ आले पंत जागा त्यांनी आखले । कितुरकर देसाई हाती भाले हैदराबादकर मोंगल आले ॥ मंत्री चिटणीस नरगुंदवाले । कोल्हटकर महारा? खटाववाले ॥ कुडुकवाल्यांनी खजिने पाठविले । गोवेकर फरास पुढे गेले ॥ लहान लहान मानकरी चुकले । थोर थोर जमेसी धरले ॥ नाना फौज पाहतांना चकले ॥ दलबादल डेरे दिधले । नगारखाने झाडू लागले ॥ गोसावी त्यामधि वायले । फक्क्ड ते सोटेवाले ॥ मग लाग्नण कितीक आले ॥ बावन पागा फारच झाले ॥( चाल )॥ कोतवाल घोडे सजविले श्यामकर्ण । भरगच्ची हत्तीवर झुला दिसे आरूण ॥ अयन्याची अंबारी गगनी तारांगण । आघाडी चालली लगी भडक निशाण ॥ सूत्रनाळी जंबुरे उंटावर रोखुन । खंडा ?? सुरे तिरकमान कटार लावून ॥ ढाल फिरंग नवाजखाणी निशंग गगन लकेरी खुन । पिस्तुल बंदुक चकमक चमके संगीन ॥ कराबीन बकमार याची खूण । राहिले एकदिल खूण करून ॥ जमराडे सरदार झांबरे शूर अतिरथी । लई धनगर शाण्णव कुळीचे मराठे होती ॥ ह्त्यार जमई जमदाड माडु घेऊन हाती । बिचवा लवंगी गुरगुज सांग सोटा बरची फेकिती ॥ सुरसेप दारूचे कैफ धुंद लढयेती । फसत बालमपेच खुबचार मारलई होती ॥ देणे महाराजांचे परिपूर्ण । चाले फौज काय पाहता दुरून ॥ भाऊ नाना. ॥२॥

नाना भाऊंनी विचार केला फौजा पहाव्या म्हणून । स्वारी निघाली बाहेर दर्शना पर्वतीच्या कारण ॥ डंके झाले चहूंकडून घोडयावर ठोविले जीन । भले भले सरदार चालती आपआपल्या मिसलीन ॥ पेंढार पुढे तोफा चालल्या दारू गोळा बार भरून । हत्तीवर सूत्रनाळ उंटावर बाण भरूण ॥ बारा हजार उंट बाणांच्या कैच्या मागे चाले दबा धरून । कराबीन बक्कामार आरब सिंध रोहिले गोलचे गोल भरून ॥ करवलवाले एकांडे पन्नास हजार रहदारी करून । बासडीवाले धनगर निवडक बाजूवर ठरून ॥( चाल )॥ पुढे होळकर चालला । शिंदेशाई नाही ( येत ) गणतीला ॥ साडेसातशे कोतवाल सजविला । त्यांला भरगच्ची झुला ॥ सहा हजार तोफा बार भरला । पायदळ निशाण कडक पुढे उडाला ॥ चार हजार सोटेवाला । सात हजार बल्लमवाला ॥ गोलचा गोल नाईक आला । मागे फौज करनाटकवाला ॥ बावन पागा बारगीर जमला ॥ माय मोर्तब आले गणतीला । साठ मानकरी मोरचलवाला ॥( चाल )॥ रंगविले हत्ती पाखरा भरजरी जरा । अंबारी साडेसातशे मोती झालरा ॥ नाना भाऊंनी करून पोषाग चंदेरी तर्‍हा । गळा कंठी पाच शिरपेच मोत्यांचा तुरा ॥ कपाळी केशरी टिळा चंद्र दुसरा । हौद्यांत बसून शाहीचा घेत मुजरा ॥( चाल )॥ नऊ लाख सैन्य एकदिल घोडा शिरा । तीस हजार अबदागिरी बरोबर चाले ढिगारा । संगे झडती चौघडे शिंगे तुतारा ॥ पर्वतीचे दर्शन घेऊन येत माघारा । असा गवे चढून ॥ शहर पुण्यास मुजरा करून । भाऊ नाना. ॥३॥

पोवाड्याचे शेवटचे कवन

शके सोळाशे पांसष्ट फाल्गुन वद्य षष्ठी आदितवार ॥ नऊ रात्र नऊ दिवस लढाई मग फिरले माघार ॥ सातशांनी धरली वाट पुण्याची निर्माल्य लष्कर । खेडया - खेडयाचे पाटिल लुटती महार चांभार । बेदड घालिती छापे वाट चालेना तिळभर ॥ पुढे बिकट बारी कैसा तारील परमेश्वर । असे सांडाव देत आले अटक अटक उतरून नऊ कोशांवर ॥(चाल)॥ तिथून अवघे फुटले पुण्याचे रस्ते भुलले ॥ फारदिसा भुलीमधे गुंगले ॥ नऊखंड फिरता चकले । अन्नाविण वाळून सुकले ॥ भक्षिती झाडांचे पाले । गोसावी कितीएक झाले ॥ तुंब हाती घेतले । किती रामेश्वराकडे झुकले ॥ काशीचे रस्ते धरले । या रितीनें सैन्य खपलें ॥ दैवाचे पुण्याशीं आले । लाखोटे सदरेवर पडाले ॥ दुःखांचे सागर फुटले ।........॥(चाल)॥ लाखोटे वाचिता झाले अवघे घाबर । नानाभाऊ बुडाले पुण्यास आली खबर ॥ नानाभाऊ बुडाले परंतु लौकिक दुनयावर । नवलाख बांगदी फुटली असा हाहाकार ॥ दक्षिण बुडाली सती पडल्या महामूर । श्रीमंताच्या तक्तापाशी भले भले मनसुबीदार ॥ स्थापिले गादीवर माधवराव नेणार । सोन्याची जळली भट्टी उरले खापर ॥ शाहू छत्रपतीचे देणे सांब अवतार । गातो सगनभाऊ ठिकाणा शाहुनगर ॥ गातो फत्तेजंग पोवाडा करून । भाऊ नाना०॥११॥





१) होनाजी बाळा


क-हाकाठचे साहित्यरत्न
-----------------------------
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३,४,५ जानेवारी २०१४ रोजी सासवडला होत आहे. साहित्यक्षेत्रातील मराठी भाषेचा हा महत्वाचा साहित्य सोहळा
होत आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या साहित्यात मोलाची भर टाकणारे आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे
क-हाकाठवर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. त्या साहित्याच्या वारसदाराची माहिती करुन देणारी मालिका.... 
लेखक - दशरथ यादव

-------------------------
१) होनाजी बाळा 
---------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली प्रेरणादायी इतिहास अंगाखांद्यावर मिरवीत संस्कृतीचा वारसा जोपासणा-या पुरंदरच्या क-हापठारावरील महान रत्नापैकी होनाजी व बाळा ही दोन अनमोल रत्ने. प्राचीन, अर्वाचीन, यादव, बहमनी, शिवशाही, पेशवाई, इंग्रज या सगळ्याच कालखंडात पुरंदरच्या क-हापठारचे योगदान कायम वाखाण्याजोगेच राहिले आहे. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाची कृपादृष्टी झाल्याने, सात गड व नउ घाटांच्या सोबतीने क-हापठार पिढ्या न पिढ्या काळाशी सुसंगत अशीच कामगिरी करीत झळकत राहिला. मग काळ कोणताही असो. काळानुरुप पुरंदरच्या मातीची प्रेरणा घेऊन अनेकांनी गौरवशाली काम केले. 

वंशपरंपरागत शाहिरी
------------------
 होनाजी हा क-हाकाठावरील सासवडमधील गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाड्यावर दुधाचा रतीब घालणे व सांयकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी मनोरंजन करीत. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसा शाहिरीचा पण व्यवसाय वंशपरंपरागत होता. होनाजीचे आजोबा साताप्पा किंवा शाताप्पा हे व त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषःता होनाजीचा चुलता बाळा हा लावणीकार होता. तो बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता. ते दोघे बाळा बहिरु नावाने तमाशाचा फड चालवीत होते. बाळाजीची हीच परंपरा पुढे होनाजीने चालविली. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा करंजकर हा सासवडच्या शिंपी समाजातील होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजविला. त्याने होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले. 
होनाजी बाळा (इ.स.१७५४-इ.स.१८४४) मुळचा सासवडचा होता. नंतरच्या काळात तो पुणे येथे राहत होता. होनाजीचे आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजीने रागदारीवर अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचना त्यांनी केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या लावणीला आज भूपाळीचे म्हत्व प्राप्त झाले. होनाजी काव्य करायचा व बाळा गायन करीत होता. म्हणून त्यांच्या फ़डाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत. 

पोवाड्याची रचना
--------------------
लावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. शब्दरचना बांधीव मुलायम होती. सहजता व शृंगाररसाचा अदभुत प्याला होनाजीने रसिकांसमोर ठेवला.इतकेच नाही तर विरहाची लावणी, गरोदर स्त्रीच्या दुःखाची लावणी, वांझेची लावणी अशा विविध लावणीतून स्त्रीमनाचे दर्शन त्यांनी घडविले. होनाजीनी काही पोवाडे रचले आहेत. खड्र्याची लढाई, रंगपंचमीचा पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, असे अनेक पोवाडे रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशा सादर करीत. होनाजीला सालीना तीनशे रुपये वर्षासन मिळत होते. पेशवाई बुडाल्यानंतर बुडाल्यानंतर बडोदेसरकारकडून त्यांना वर्षासन मिळे. पेशवाई गेल्यानंतर होनाजीने लिहिलेला पोवाडा अतिशय ह्दयद्रावक आहे. होनाजीने पेशवाईतील रंगढंग मोठया कलात्मकतेने व यथेच्छपणे रंगविले आहेत. होनाजीने रचलेल्या लावण्यात अंतरीक प्रेम, जिव्हाळा, सामाजिक नीती याची कदर इतर शाहिरांपेक्षा जास्त आहे. लावणीरचना सरळ, ओघवती, शब्दलालित्याने नटलेली आहे. होनाजी स्वतःच्या लावण्याबरोबर बाळा करंजकर यांच्याही लावण्यात गात असत. सासवडही होनाजीची अजोळभूमी सासवड. काव्याची पुष्पाची पहिली पाकळी त्यांनी येथील काळभैरवनाथाच्या चरणी अर्पिली आहे. धनाने दारिद्रयात असलेला हा शाहीर सासवडला धान्यबाजारपेठेत हल्लीच्या शेडगे यांच्या दुकानाच्याजवळ राहत होता.त्याचा जिवलग मित्र बाळा करंजकरचे घर पाकडी जवळ दगडोबा शिंदे यांच्या वाड्यात होते. होनाजीचा अंत दिवेघाटातील बाभुळबनात मारेक-यांच्या हल्ल्यात झाला. 
मर्द मराठी थाप डफावर
खन खन खंजीर बोले सत्वर
तुण तुण तुण तुण म्हणे तुणेतुणे
झुनक झुनक झांज किणकिणे
 सूर खडा शाहिरी धडाधडा म्हणे पोवाडा जोशात
थेट तशी गम नेट लावून सुरकरी करती साथ
नसानसातील रक्त रसाला येईल आज उधान 
अशा मराठा बाण्याच्या काव्यातून म-हाठ मोळा रांगडेपणाही खळखळाळत होता. होनाजीची भूपाळी त्याच्या सात्विक भाषेचा प्रत्यय देते. हुबेहुब शब्दचित्रे तयार करण्याचे शब्दसामर्थ्य त्यांच्या काव्यात होते.
हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा 
किंवा
लटपट लटपट लटपट लटपट
तुझ चालणं गं मोठ्या नख-यांचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं
नारी गं नारी गं...
कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तरुणपण अंगात झोकं मदनाचा जोरात
चालणं गं मोठ्या नख-याचं
बोलणं गं  मंजुळ मैनेचं.
नारी गं नारी गं....
हे अमर भूपाळी या सिनेमातील गीत मराठी माणसांच्या मनामनात कोरले आहे. वसंत देसाई यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी गायले आहे.
होनाजीवर मारेकरी घातले
--------------------------
होनाजीला वंशपरंपरेने कवित्वाची देणगी लाभली होती. पुराणकथा व पंडिती काव्याचा त्याचा अभ्यास होता. होनाजीची बैठकीची लावणीही प्रसिद्ध होती. शास्त्रीय रागदारीवर  संथचालीवरच्या लावण्या त्यांनी रचल्या. तमाशा लावणीला तबल्याच्या ठेक्याची साथ देणे होनाजीने सुरु केले. शास्त्रीयगायन तमाशात आणणे आणि ढोलकीबरोबर वा स्वतंत्रपणे तबल्याचा ठेका घेणे अनेकांना मंजूर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी बाजीरावाचे कान भरले. होनाजीला तमाशात तबला आणण्यास मनाई झाली. होनाजी हट्टाला पेटला. त्याने आव्हान म्हणूनच ही घटना स्वीकारली. तो आपल्या अहिली नावाच्या शिष्येला घेऊन पुणे सोडून मुंबईला आला. मुंबईत राहून शिष्येच्या गळ्यावर शास्त्रीय गायकीचे संस्कार केले. व्यवस्थिक तालीम करुन लावणी शास्त्रीय ढंगात म्हणण्यात त्या शिष्याला पारंगत करुन तबल्याचा समावेश पुन्हा दरबाराच्या कार्यक्रमात सुरु केला. होनाजीने लावणीच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम केले. होनाजीचे जीवन अनेक नाट्यपूर्णँ घटनांनी भरले आहे. दुस-या बाजीराव पेशव्याचा निकटवर्ती कारभारी त्र्यंबकजी डेंगळे हा होनाजीचा आश्रयदाता व जवळच्या संबधातील होता. होनाजी सगळी मिळकत डेंगळ्याच्या वाडयात ठेवत असे. पुढे राजकारणाच्या उलट्या तेढ्या फे-यात डेंगळेची मिळकत इंग्रजाकडून जप्त झाली. त्यात होनाजीची व्यक्तिगत चीजवस्तूही नाहीशी झाली. होनाजी कफल्लक झाला.कुठून तरी कसे तरी चार पैसे मिळवावेत व चरितार्थ चालवावा असे काहीसे त्याचे जीवन सुरु होते. जीवनात सगळीकडे होनाजीने चांगले यश मिळविले. त्यामुळे स्वाभाविकच विरोधकांची पोटदुखी वाढलेली होती. होना गवळ्याचा चुना, असे त्यांच्या स्थितीबद्दल विरोधकांनी म्हटले आहे. त्याच्या विरोधात असलेल्या कोणा पाताळयंत्रि माणसाने होनाजीवर मारेकरी घातले. असह्य शस्त्राच्या माराने होनाजीचा छिन्नविच्छिन्न देह पुणे शहरात आणून टाकला. दारुण यातनांनी होनाजी गतप्राण झाला. तो दिवस होता भाद्रपद कृष्णचतुदशी.
होनाजीबाळा संगीत नाटक
----------------------------------
संगीत नाटकांचा एक सुवर्णकाळ होता. होनाजीबाळा हे संगीत नाटक भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, माया जाधव हे कलाकार काम करीत. सध्या मुंबई साहित्य संघाने हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले आहे. शहाजी काळे, स्वप्निल परांजपे, बाळा नाईक, अभिनय भोसले, राणी भोसले हे कलाकार आहेत. घनश्याम सुंदरा या भूपाळीने नाटकाला मोठी लोकप्रियता मिळाली.
`घनःश्याम सुंदरा’ ही श्रवणीय भूपाळी नव्या-जुन्या मंडळींनी रेडिओवर ऐकलेलीच आहे. त्याचप्रमाणे `श्रीरंगा कमला कांता’ ही गौळणही बहुश्रूत आहे. पण मूळ कथानकासह त्याचा अनुभव आपल्याला `होनाजी बाळा’ या नाटकात घेता येतो. होनाजी हा एक गवळी. तर बाळा तमासगीर. या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा. पण एकाच शरीरातील आत्मा असे हे नाते. दोघांना वेगळे करता येत नाही. होनाजीशिवाय बाळाला अस्तित्व नाही आणि बाळाशिवाय होनाजीचा विचारच होऊ शकत नाही, असे हे घट्ट नाते. होनाजी जितका गंभीर तितकाच बाळा हा मिश्किल. गाईंना चरायला नेल्यानंतर होनाजीला कवने करण्याचा नाद. त्याच्या कुळाचा मूळपुरुष श्रीकृष्ण याच्यापासून ही संगीताची देण लाभलेली. पण सर्वच काळात सर्वच कला लोकप्रिय होतातच असे नव्हे. होनाजीचा कवनांचा छंदही काहीकांना पसंत नव्हता. पण कलावंतीण गुणवती ही मात्र त्याच्या कवनांवर भारलेली असते. होनाजीने कवणे करावीत आणि यमुना-गुणवती या मायलेकींनी ती बाळाच्या साहाय्याने पेश करून `वजनदारां’ना खूश करणे हा उत्तर पेशवाईतील परिपाठ होता. या गुणवतीची कीर्ती पुण्यात पंचक्रोशीत पसरली होती. त्यातूनच उदाजी बापकर हा युवा सरदार तिच्या अदाकारीवर भाळतो. तिच्या एकतर्फी प्रेमातच पडतो. पण गुणवतीचा जीव अडकलेला असतो होनाजीत आणि त्याच्या शाहिरीत. यातूनच होनाजी व बाळा यांचे उदाजीशी वैर उभे राहते. मोरशेट हा सुरुवातीला उदाजीच्या मागे असतो. पण आपली मर्यादा सांभाळून जेव्हा पेशवाई डबघाईला येते तेव्हा समशेरीच्या जोरावर ती सावरण्याऐवजी हा उमदा सरदार होनाजीचा काटा काढण्यावर भर देतो. एकीकडे प्रेम, दुसरीकडे शाहिरी यात हे द्वंद्व होते. कला ही कोणाची बटीक नसते, हे होनाजी उदाजीला ठासून सांगतो. अखेरीस तलवारीपेक्षा शाहिराची डफावरील थापच सरस ठरते. असा हा सारा `होनाजी बाळा’चा मामला. आहे.
याहो याहो रसिकवरा
द्या कान जरा, लावा नजरा
शाहीराचा घ्या मुजरा
मराठी जीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाहिरीत उमटले आहे, मराठी वाडःमयातील बावनकशी सोनं म्हणजे लावण्या व पोवाडे आहेत. मराठीशाहीच्या उदयाबरोबर शाहिरी काव्य जन्मले. या काव्यात मराठीशाहीचे प्रतिबिंब असून, वीर रसाची उधळण करणारे पोवा़डे व दिलखेचक अदाकारीच्या शृंगारिक लावणीने मराठी साहित्यात व मनांमध्ये वेगळेच स्थान निमार्ण केले. अशा शाहीर होनाजी बाळाच्या डफाच्या थापेवर व तुणतुण्याच्या तारेवर महाराष्ट्र नागासारखा डोलला  आहे. घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या सात्विक, प्रसन्न भूपाळीप्रमाणेच होनाजी अमर झाला. 
तू पाक सूरत कामिना
तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनिया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती
नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवीनवती तू चंद्रकळा सवती, गायनामधे गुणिजन सविती
कंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कांती
तुला गुणिजन अवघे चहाती
नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती
अशा प्रकारची प्रभावी गीत रचना करणारा होनाजी हा एक प्रतिभावंत शाहीर होता.

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१३

नाटकात अभिनय

भुलेश्वर यात्रेत श्रावणी सोमवारानिमित्त माळशिरस येथे सादर झालेल्या मंगळसूत्र अर्थात सुडाने पेटला वणवा या तीन अंकी कौटुंबिक नाटकातील एका दृश्यात दशरथ यादव..सोबत सोनाली पवार.






शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

साहित्याचे फोटोतून दर्शन


                           आठवणींचा रुपेरी खजिना




 

 
 

 
 
 

 
 







कळू लागले


कळू लागले


निसटलेले दिवस आता छळू लागले
जीवन माझे मला आता कळू लागले

थकून गेल्या बघा या जुनाट वाटा
पाय पुन्हा घरांकडे वळू लागले

खरेपणाने वागलो, डाग ना लागला कधी
शुभ्र कपडयातले मन आता मळू लागले

पावसाळा कोरडा गेला, शेती ओसाडली
कडक उन्हाळ्यात, आभाळ गळू लागले

उमगले मला जेव्हा, महत्व आयु्ष्याचे
वय दिवसाच्या मागे बघा पळू लागले

कित्येक मैल आता बालपण राहिले दूर
वार्धक्य खुणावताना तारुण्य चळू लागले

पेटते निखारे घेउन संकटे पचवली किती
हिरव्यागर्द मनाचे आतून पानही गळू लागले

निवडणूक अशी लढलो शत्रू भेदला आरपार
जिंकण्याच्यावेळी नेमकेच यार पळू लागले

दशरथ यादव, पुणे

हाय विठोबा..

हाय विठोबा..

कसली माळ कसला टाळ अजून होतो विटाळ
हाय..विठोबा सांगा कसं पेलायचे हे आभाळ

आल्या पिढ्या गेल्या कीती युगे झाली फार
मनुवाद्यांच्या मेंदूत अजून सुरुच आहे कुटाळ

कान्होपात्रा जनाबाई जात्यावर दुःख दळतात
भगवा ध्वज खांद्यावर तरी वारकरीच नाठाळ

कीर्तन, प्रवचन हरिपाठात बदल कराया हवा
मनू घुसल्याने वारीत परिवर्तन झाले भटाळ

नामा ज्ञाना तुकाचं खरं कुणी सांगत नाही
तेच देव त्याच कथा ऐकून झाल्यात रटाळ

वारीचा धंदा झालाय दिंडी म्हणजे मलिदा
चोर झालेत श्रीमंत गरीबांची होते आबाळ

नोट दाखवा बघा दर्शनाला नाही लागत वेळ
तूप लोणी खाऊन हा बडवा झालाया चाठाळ

दशरथ यादव, पुणे

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१३

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण 
शोध व बोध ( भाग १)

विषमता संपविणारी युगक्रांती..
----------------------------------
दशरथ यादव, पुणे



मराठा आरक्षण
--------------
मराठा आरक्षणाची चर्चा जशी सुरु झाली, तशी स्वतःला सवर्ण म्हणणारे काही मराठे जणू आता आपली राजगादी जाणार अशीच समजूत करुन कोकलत राहिले. मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश झाला म्हणजे मोठे काही तरी संकट आहे, अशी ओरड करुन ओबीसीवर्गातील काही जाणकार म्हणणारे गळा काढून रडू लागले. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा निणर्य म्हणजे पुन्हा एकदा बळी, गौतम बुद्धाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणावी लागेल. गौतमाच्या विचारांचे शिवराज्याची ही नांदीच म्हणाना. मराठ्यांनी ओबीसी वगार्गात प्रवेश करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताची पायाभरणी होय. ब्राम्हणवर्गाच्या बाजू बाजूला घोटाळून स्वतःला सवर्ण म्हणत जगणा-या मराठयांचा इतर मागस वर्गात प्रवेश म्हणजे विषमता मोडून काढणारी, सनातनी गाडणारी व जातीअंताची भव्य क्रांती आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी अनेक महापुरुष, संत, समाजसुधारकांनी प्रयत्न केला पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या चळवळी त्या काळापुरत्या राहिल्या. त्याला कायमस्वरुपाची बैठक देण्याचे काम मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड व शिवधर्मामुळे झाले आहे. महात्मा फुल्यांनी सत्यधर्मा्च्या माध्यमातून मोठा प्रयत्न केला. मधल्या काळात फुल्यांची चळवळ थोडी थंड झाली होती, पण कांशीराम व पुरुषोत्तम खेडेकरसाहेब यांच्या परिश्रमातून मोठी क्रांती बहुजनसमाजात झाली. मराठा आरक्षण हा त्यां क्रांतीचाच एक भाग आहे. समाजात स्वतःला सवर्ण मानणारा मराठा कुणबी समाज ओबीसीसमाजत येईल, त्यातून पुन्हा एकदा शिवसंस्कृतीचा काळ उभा राहिल. माणसात, मनात आणि् घराघरात मतभेद करणार सनातनी पंथ आपोआप बाजूला जाईन. याचीही पहिली पायरी आहे, म्हणून मराठा आरक्षणाला सवलतीच्या पलीकडे एक वेगळे मह्त्व आहे. समतेसाठी आटापिटा करणारेच सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन कोणत्या तरी समुहाच्या स्वार्थासाठी मराठा कुणबी व ओबीसी वर्गात दरी पाडीत आहेत. मराठा आरक्षण ही विषमता संपविणारी युगक्रांती ठरणार आहे. आरक्षणाच्या सवलतीपलीकडे जावून याचा विचार केला तर एकसंध समाजाच्या पायाभरणीचे कामही होणार आहे.

मराठा आरक्षण मुळात गरीब निमूर्लनाचा कार्यक्रम नाही. मराठा गरीब आहे म्हणून आरक्षण द्या हे घटनेत बसत नाही, सविंधानाचे कलन १६-४ नुसार ज्यांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही, त्यांना देता येते.मराठा समाज स्वतःला क्षत्रिय मानतो. मंडल आयोगाने त्यांना प्रगत मानले आहे, देशातील सगळया राज्यात आरक्षण असून पकेज आहे, नोकरी, शिक्षण व राजकीय सत्ता असे आहे, महाराष्ट्रात फक्त नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी आहे. राज्यात सवार्धिक शिक्षण संस्था सत्ताधा-यांच्या मालकीच्या आहेत. ते स्वजातीला मोफत किंवा सवलतीत का शिक्षण देत नाहीत. साखर काऱखाने, सुतगिरण्या, दुधसंघ, सोसायट्या, पंतसंस्था, सहकारी बॅंका ताब्यात असूनही समजातील गरजू मुलांना कुठे मदत होते, देशाच्या संपत्तीत सगळ्यांचा वाटा नाही काय़
महात्मा फुले, शाहु व आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पन्नास वषार्षातील सामाजिक वास्तव कसे बदल गेले बघा. मराठा ही सत्ताधारी जात, मराठा व कुणबी या दोघांची लोकसंख्या एकुण तीस टक्के...मात्र ही संख्या पन्नास टक्के असल्याचे भासवले जाते. त्यात कुणबी अगोदरपासूनच ओबीसीमध्ये आहेत. गेल्या ६० वर्षात वेगवेगळ्या ९ आयोगाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास नकार दिला आहे. बापट आयोगानेही विरोध केला आहे. मात्र मराठ्यांनी कुणबीच्या दाखवल्यावर निवडणूक लढवून ते सत्ता भोगीत आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसीतील लोक जवळ घ्यायला तयार नाहीत त्यातून संघर्ष होणार आहे, पण मराठयांना आरक्षण दिले तर त्याचा उपयोगा केवळ सवलती पुरता होईल असे नाही, तर एकसंध भारताची पायाभरणी करण्यासाठी होईल. हे नाकारून चालणार नाही. आरक्षणाला विरोध करणारे अजूनही जुनाट संस्कृतीच्या विचाराचे पाईक दिसत आहेत. कायम ब्राम्हण समजाने फसवीत मराठ्यांना सवर्ण केले पण वागणूक आणि फायदे मात्र शुद्रापेक्षा खालचे दिले हे कबुल कऱण्याची मानसिकता अजूनही मराठा समाजात होईना. मुळात ज्या कुणबी समाजाला मराठा म्हणून संबोधले जाते त्याचा मूळ इतिहासही तपासण्याची गरज आहे. पण याकडे दुलर्लक्ष करुन ओबीसी बांधवांना काही मतलबी हितकर्ते फसवून भडकावीत आहेत. मऱाठे जर आरक्षणात आले तर आपले काय ही भीती समाजात निमार्ण केली जात आहे. ही अनाठायी आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन कोण कोण गलेलठ्ट झाले ते बघा. किती तरी सवलतीचा फायदा घेवून मोठे झालेत. तर कीती तरी मराठा समाजातील लोक हलाखीत जीवन जगत आहेत. विदर्भीत आत्मह्त्या करणा-यामध्ये ९० टक्के लोक मराठा आहेत. ज्याना खरी आरक्षणाची गरज आहे, त्यांना मिळत नाही. ज्यांनी लाभ घेतला आहे ते हक्क सोडायला तयार नाहीत. ही सध्याची स्थिती आहे.
ज्या सनातीनी मुळे समाजात आरक्षणाची आणि समतेसाठी लढण्याची वेळ आली त्यांच्या विरोधात लढा उभारुन लोकांच्या जागृती करणा-या फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराएवजी केवळ स्वाथार्थासाठीच काही जण मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर चळवळ करुन जागृती करीत समाज उभा राहिला..पण सध्या मराठा व मराठेत्तर असा वाद निमार्णा करण्याचा उद्योग काही सनातनी वैदिक मंडळी ओबीसी समाजातील शहाणे हाताशी धरुन करीत आहेत. हे समाज उभारणीच्या कामातील मोठा अडथळा आहे. अजूनही आपण जातीअंताची लढाई करण्याच्या गप्पा मारीत असताना जात सोडीत नाही हे मोठे दुदैव समोर येते.

मराठा आरक्षण मुळात गरीब निमूर्लनाचा कार्यक्रम नाही. मराठा गरीब आहे म्हणून आरक्षण द्या हे घटनेत बसत नाही, सविंधानाचे कलन १६-४ नुसार ज्यांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही, त्यांना देता येते.मराठा समाज स्वतःला क्षत्रिय मानतो. मंडल आयोगाने त्यांना प्रगत मानले आहे, देशातील सगळया राज्यात आरक्षण असून पकेज आहे, नोकरी, शिक्षण व राजकीय सत्ता असे आहे, महाराष्ट्रात फक्त नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी आहे. राज्यात सवार्धिक शिक्षण संस्था सत्ताधा-यांच्या मालकीच्या आहेत. ते स्वजातीला मोफत किंवा सवलतीत का शिक्षण देत नाहीत. साखर काऱखाने, सुतगिरण्या, दुधसंघ, सोसायट्या, पंतसंस्था, सहकारी बॅंका ताब्यात असूनही समजातील गरजू मुलांना कुठे मदत होते, देशाच्या संपत्तीत सगळ्यांचा वाटा नाही काय़
महात्मा फुले, शाहु व आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पन्नास वषार्षातील सामाजिक वास्तव कसे बदल गेले बघा. मराठा ही सत्ताधारी जात, मराठा व कुणबी या दोघांची लोकसंख्या एकुण तीस टक्के...मात्र ही संख्या पन्नास टक्के असल्याचे भासवले जाते. त्यात कुणबी अगोदरपासूनच ओबीसीमध्ये आहेत. गेल्या ६० वर्षात वेगवेगळ्या ९ आयोगाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास नकार दिला आहे. बापट आयोगानेही विरोध केला आहे. मात्र मराठ्यांनी कुणबीच्या दाखवल्यावर निवडणूक लढवून ते सत्ता भोगीत आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसीतील लोक जवळ घ्यायला तयार नाहीत त्यातून संघर्ष होणार आहे, पण मराठयांना आरक्षण दिले तर त्याचा उपयोगा केवळ सवलती पुरता होईल असे नाही, तर एकसंध भारताची पायाभरणी करण्यासाठी होईल. हे नाकारून चालणार नाही. आरक्षणाला विरोध करणारे अजूनही जुनाट संस्कृतीच्या विचाराचे पाईक दिसत आहेत. कायम ब्राम्हण समजाने फसवीत मराठ्यांना सवर्ण केले पण वागणूक आणि फायदे मात्र शुद्रापेक्षा खालचे दिले हे कबुल कऱण्याची मानसिकता अजूनही मराठा समाजात होईना. मुळात ज्या कुणबी समाजाला मराठा म्हणून संबोधले जाते त्याचा मूळ इतिहासही तपासण्याची गरज आहे. पण याकडे दुलर्लक्ष करुन ओबीसी बांधवांना काही मतलबी हितकर्ते फसवून भडकावीत आहेत. मऱाठे जर आरक्षणात आले तर आपले काय ही भीती समाजात निमार्ण केली जात आहे. ही अनाठायी आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन कोण कोण गलेलठ्ट झाले ते बघा. किती तरी सवलतीचा फायदा घेवून मोठे झालेत. तर कीती तरी मराठा समाजातील लोक हलाखीत जीवन जगत आहेत. विदर्भीत आत्मह्त्या करणा-यामध्ये ९० टक्के लोक मराठा आहेत. ज्याना खरी आरक्षणाची गरज आहे, त्यांना मिळत नाही. ज्यांनी लाभ घेतला आहे ते हक्क सोडायला तयार नाहीत. ही सध्याची स्थिती आहे.
ज्या सनातीनी मुळे समाजात आरक्षणाची आणि समतेसाठी लढण्याची वेळ आली त्यांच्या विरोधात लढा उभारुन लोकांच्या जागृती करणा-या फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराएवजी केवळ स्वाथार्थासाठीच काही जण मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर चळवळ करुन जागृती करीत समाज उभा राहिला..पण सध्या मराठा व मराठेत्तर असा वाद निमार्णा करण्याचा उद्योग काही सनातनी वैदिक मंडळी ओबीसी समाजातील शहाणे हाताशी धरुन करीत आहेत. हे समाज उभारणीच्या कामातील मोठा अडथळा आहे. अजूनही आपण जातीअंताची लढाई करण्याच्या गप्पा मारीत असताना जात सोडीत नाही हे मोठे दुदैव समोर येते.

आरक्षणाचे वास्तव
चार एप्रिलला मराठा आऱक्षणाचा डंका वाजला. मुंबइला महामोर्चा निघाला. त्यावेळी दोन महिन्यात निणर्णय जाहीर करण्यात येईल असे सरकारने सांगितले. बाकीच्याना आरक्षण चालते पण मराठ्यांना आरक्षण म्हटले की मुठी आवळल्या जातात. तो मराठा दोष म्हणून. ही मानसिकता इतर समाजात रुजायला कारणही तसे सनातनी न इथली संस्कृतीच आहे. पण सगळ्यांना तिचा सोयीस्कपणे विसर पडलेला दिसतो. मराठ्यांच्या हातात सत्ता आहे असे दिसत असले तरी ते मराठा असूनही सत्ताधारी मराठ्यांसाठी काही करीत नाही हा आजवरचा अनुभव आहे, मराठा समजातील लोक सत्तेवर आहेत, त्यामुळे इतर जातीसमूहात द्वेष निमार्ण झाला. जेधे-जवळकरांची सत्यशोधक चळवळ मराठ्यांनी काॅग्रेसमध्ये विलीन केल्याने मोठा तोटा झाला.त्यांनंतर घराणेशाहीची सत्ता सुरु झाली. सत्यशोधक चळवळ सुरु असती तर केव्हाच अस्तित्वाची जाणीव होऊन मराठा असल्याचा अंहकार कमी झाला असता. तसेच आरक्षणाचा विषय मागी लागला असता. मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ, गोपीनाध मुंडे पुढे आले. मिडियाच्या साह्याने टीवटीव करीत राज ठाकरे कोकलत आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी २६ जून १९०२ साली ब्राम्हण, पारशी, कायस्थ, शेणवी वगळता मराठा तसेच इतर बहुजन बांधवाना शिष्यवृती व सेवेत आरक्षण देवून वस्तीगृहाची व्यवस्था केली.
राजस्थानात गुर्जर, हरियाणात जाटांच्या जातीय आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.मराठा शब्दाला प्रदेशवाचक शौर्यवाचक, बलिदानवाचक व त्यागाची झालर आहे. सध्या राज्यात काही जण प्रांतिक, भाषिकवाद करीत आहेत.ब्राम्हणी धमार्मानुसार वागणार बहुजन मंगलकामात सत्यनारायण घालून सत्यानाश करुन घेतो. मराठा हा समूह कधीच संघटीत नसतो. डॅा बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची जणगणना, आरक्षासाठी १९५४ ला कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंत लगेचच पटना (बिहार) येथे बॅकवडर्ड क्लासच्या अधिवेशनात डा.पंजाबराव देशमुख, आर.एल.चंदापुरीच्या निमंत्रणाने गेले तेव्हा पंजाबरावांना नेहरुने कृषीमंत्री केले. जातीनुसार मंत्रीपदे बहाल केली जातात. जसे पंजाबराव देशमुख, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांना कृषीमंत्रीपद दिले.


भारतीय संस्कृतीचे आद्यवाडःमय

भारतीय संस्कृतीचे आद्यवाडःमय


लेखक - दशरथ यादव


१) सूतवाडःमय व सूतसंस्कृती

भारतीय वाडःमयात वेदग्रंथाचे आक्रमण होण्यापूवी सूत संस्कृती ही पुर्वेस बिहार, दक्षिणेत दंडकारण्यापर्यंत पसरली होती. सिंहलद्वीपातही हीच संस्कृती होती. शिव, विष्णू ही या संस्कृतीची दैवते. यांचा विद्याधर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, पिशाच्च व देवयोनिवंर या संस्कृतीचा विश्वास होता. यात अग्निधर्म संपुष्टात पण थोडा शिल्लक होता. यात मुनि व यति हे दोन परमार्थास वाहिलेले वर्ग होते.वीरकथा, दृष्टांतदाखले,, उपदेशपरकथा हे साहित्य होते.या संस्कृतीचा काळ म्हणजे दाशराज्ञ युद्धपूर्व म्हणजे दाशरथी रामाचा काल येतो. मातृ व सूत संस्कृतीचया लोकांचा संबध आल्यावर दोहोंची मिळून एक संस्कृती गंगेच्याकाठी निर्माण झाली. सूतांशी संबध जोडण्यासाठी पौराणिक ग्रंथातील राजांची नावे यज्ञविधीशी जोडण्यात आली. तसेच नाग, गंधर्व पिशाच यांन यज्ञविधीतील दिवस वाटले व शिव, विष्णूंची अर्वाचीन काळी परिचित स्वरुपे तक्तालीन वेद व यंज्ञमंत्रात शिरली. या दोघांच्य संपर्काने यज्ञकर्म तात्पुरते विस्तीर्ण झाले.पुढे देशांची उचल होऊन यज्ञकर्म संपुष्टात आले. तसेच भारतीय संस्कृतीस पुन्हा सूतसंस्कृतीचे वळण मिळाले. वैदिक संस्कृती केवळ अंगास चाटून गेल्यासारखे झाले. परंतु पुढे यज्ञकर्तेपणामुळे उत्पन्न झालेली ब्राम्हणज्ञातीने पुढे स्थानिक संस्कृती जशी अशी घेऊन तिचे विधिनिषेधे, उत्सव, वाडःमय,सणवार यांच्यामध्ये व्यवस्थिपणा आणण्यास सुरवात केली. त्यामुळे सूतसंस्कृतीचे स्वरुप जरी बदलले नाही तरी तिच्यावर वेदास मानणा-या ब्राम्हणाचे दडपण पडले. व या संस्कृतील लोक वैदिक संस्कृती म्हणू लागले. आपणापाशी जे सूतसंस्कृतीचे जे वाडःमय. आहे ते ब्राम्हण, बौद्ध व जैन आवृतिकारांनी विकृत केलेले मिळाले आहे. त्यामुळे सूतसंस्कृती कथेचे खरे स्वरुप हे अनुमानानेच काढावे लागते. महाभारत हे त्या प्रकारच्या कथांचे मुख्य संग्रहस्थान आहे. काही सूतकथा रामायण, पुराणे यात ग्राथत झाल्या तर काही कथासरित्सागर
ग्रंथात आहेत.

महाभारत (सूतकथा) -

महाभारत हा एक वीरकथासंग्रह असून तो काव्यमय ग्रंथभांडार आहे. महाभारत म्हणजे भरतांच्या महायुद्धाचा वृतांत. भरत हे क्षात्रिय राष्ट्र होते. दुष्यंत व शकुतंला यांचा पूत्र भरत हा भरतांच्या राजवंशाचा मूळ पुरुष. हे गंगा यमुना नद्यांच्या वरील भागाकडे राहत. या वंशजापैकी कुरु राजा फार प्रमुख  होता. त्यांचे वंशज ते कौरव. हे भारत लोकांवर खूप काळ राज्य करीत होते. त्यावरून एका राष्ट्राला कुरु कौरव हे नाव मिळाले. यालाच कुरुक्षेत्र असे म्हणतात. महाभारत हा शब्द महाभारताख्यानम याचा संक्षेप शब्द आहे. कौरवांच्या राजघराण्यातील भांडणावरुन रक्तपात झाला. यात कुरु व भरताचे घराणे यांचा नायनाट झाला. महाभारतावरून युद्धाची माहिती मिळते पण पुरावे सापडत नाही. तरी महाकवीने युद्धाची हकीकत गीताच्या रुपाने मांडली आहे.शेकडो वषार्षात या वीरकाव्यात बराच समावेश होत गेला. अनेक दंतकथांचा त्यात समावेश झाला...महाभारताचे मूळ काव्य हे सुतकथामधील भाग आहे. परंतु त्यात कालानुरुप अनेकांनी समानेश केल्याने त्याचे मुळकथानक किंवा काव्य शोधण जड आहे. महाभारत हे वीरकाव्य आहे. पण तसेच ते सुतांचे साहित्यभांडार आहे. वीरकाव्य ही सूतांची असून ती ब्राम्हणांच्या ताब्यात कशी गेली. त्यात काय बदल झाले. सूतांच्या वीरकाव्याचा त्यांनी उपयोग करुन पौराणिक देवाच्या गोष्टी रचून, धर्मशास्त्र, ज्ञान, उपदेशपर गोष्टी, ब्राम्हणतत्वज्ञान यात उपयोग करुन ब्राम्हणांचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. वीरकाव्यात अदभुत दंतकथा व गोष्टी घुसडुन त्याकाळी समाजावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. महाभारत हे फार लोकप्रिय असून, क्षत्रिय लोकामध्ये त्याचा प्रसार झाल्याने या ग्रंथावर वैदिक परंपरेचा संस्कार झाला नाही. वेद जाणणा-या ब्राम्हाणांनी ग्रंथ फार दुरुस्ती करुन सुधारविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण क्षात्रधर्म मृतकल्प होऊन अरण्यकयी धर्माकडे ब्राम्हणाधि सगळे गेले त्यामुळे ब्राम्हणांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणीही धर्म व यज्ञयागाबाबत अगदी थोडी माहिती आढळते. महाभारतात सुधारणा करुन त्यांचे उपबहृण करण्याचे काम ज्यांनी केले ते बहुधा पुरोहितच होते. शिव, विष्णू या पौराणिक देवांच्या कथांची जोपासना त्यांनीच केली. पुराणाच्या धतीर्तीवर स्थानिक कथा, विष्णू व शिव यांच्या कथा यांचा प्रवेश महाभारतात झाला. ज्या ठिकाणी मोठा देव म्हणून विष्णूची पूजा प्रचलित होती तेथे वीरकाव्याची अधिक जोपासना झाली. ब्राम्हणाशिवाय हिंदुस्थानात धर्मपारायण लोकांचा एक वर्ग होता. ते हिरारीने वाडमयाचा प्रसार करीत. हे संन्यासी, वानप्रस्थाश्रमी व भिक्षू लोक होत. बुद्धांच्यावेळी प्रचलित असलेले पंथ याच लोकांनी काढले. यतिचे तत्वज्ञान व नीतीशास्त्र याचाही महाभारतात पुढे समावेश झाला. महाभारत हे वीरचरित्र असले तरी भारतीय ग्रंथकार ते महाकाव्य असे समजतात. या ग्रंथाचे अठरा भाग केले असून प्रत्येकाला पर्व असे नाव दिले आहे. हरिवंश या नावाचा एक भाग पुरवणीत जोडला. शंभर पर्वामध्ये विभागणी केलेल्या एकदंर श्लोकांची संख्या एकलक्ष आहे. कृष्णद्वपायन ऋषी किंवा व्यास त्याने हा ग्रंथ रचला असे म्हणतात. महाभारतातील नायकांचा हा समकाली व नातलगही होता असा त्यांचा संबध आढळतो. काव्याची दंतकथात्मक उत्पती दिली असून, मूलधर्मग्रंथ या दृष्टीने स्तुती केली. जुन्या लेखाचे काव्यात नवीन लोकांनी टाकलेली भर स्पष्टपणे रचनेवरुन जाणवते. महाभारत हा एकच ग्रंथ नसून अनेक ग्रंथाचे भांडार आहे.

व्यास जन्माची दंतकथा
- पराशर नावाचा ऋषीचा हा पूत्र. एके दिवशी सत्यवती या ऋषीच्या नजरेस पडली. ही मुलगी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडली होती. कोली लोकांनी तिचे पालन व पोषण केले. तिचे सौदर्य पाहुन मोहित होऊन तिच्या बरोबर समागम करण्याची ईच्छा त्याने व्यक्त केली. पूत्र झाल्यावर आपले क्रौमार्य परत मिळावे या अटीवर तिने ऋषीचे म्हणणे कबुल केले. दोघांचा समागम झाल्यानंतर यमुनानदीमधील एका द्वीपामध्ये तिला पूत्र झाला. द्विपामध्ये जन्मला म्हणून त्याचे नाव द्विपायन ठेवले. तो मुलगा मोठा झाल्यावर तप करायला निघून गेला. सत्यवती पुन्हा कुमारी झाली. नतर कुरुराजा शंतनु याच्याशी तिचे लग्न झाले.चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र तिला झाले. शंतनु व चित्राडगद मरण पावल्यावर विचित्रवीर्य राजा झाला. पण तो निपुत्रिक झाला. त्याला दोन बायका होत्या. आपला वंश बुडु नये म्हणून धर्मशास्त्रानुसार द्वैपायनाने भावजयीच्या ठिकाणी संतती उत्पन्न करावी यासाठी सत्यवतीने द्वैपायना बोलावणे पाठविले. द्वैपायन हा कुरुप होता तरी काळा केस दाढी कांती काळी होती. (म्हणूनच त्याचे कृष्ण नाव काळा म्हणून असावे.) त्याचा प्रंचड वास येत होता. एका राजपुत्रीजवळ तो जाताच त्याची मुद्रा असह्य झाल्याने तिने डोळे मिटून घेतले तिला जन्मांध पुत्र झाला तो हाच धुतराष्ट्र होय. व्यास दुस-या स्त्रीजवळ गेला तेव्हा त्याला पाहुन ती पांढरी फटफटीत झाली. तिला निस्तेच असा पूत्र जन्माला आला तो म्हमजे पांडू.महाभारतातील पाच महानायकांचा हा पिता. द्वैपायनाने आणखी एका स्त्रीशी समागम करण्याचे ठरविले परंतु ती हुशार असल्याने तिने आपल्या एवजी दाशीला पाठविले.ही गोष्ट ऋषीच्या लक्षात आली नाही. त्या दाशीला विदूर नावाचा पूत्र झाला...पांडु व धृतराष्ट्र यांचा तो मित्र होता. धृतराष्ट्राचा विवाह गांधार राजकन्या गांधारी हिच्या बरोबर झाले. त्चांना शंभर मुलगे. दुर्योधन हा थोरला होता. पंडुंला दोन बायका होत्या. थोरली यादवराजकन्या कुंती व धाकटी मद्रराजकन्या माद्री. कुंतीला धमर्म,भीम,अर्जुन व माद्रीला नकुल व सहदेव ही मुले होती. हा कुरुप व दुर्गंधीवान ऋषी कृष्णद्वैपायन व्यास हा महाभारतातील नायकांचा पितामह होता असे अनक ग्रंथावरुन समजते. महाभारतातील या दंतकथा व मांडणी किंवा उत्पत्ती वास्तव वाटत नाही. व्यासानी आपले मोठेपण  सिद्ध करण्यासाठी केलेला हा खटाटोप असावा असेही दिसून येते..

महानायकांचा जन्म
१८८६ साली जर्मनीत एडाल्प हाल्टझमन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध करुन महाभारताच्या स्वरुपाची चिकित्सा केला. महाभारतात खूप काव्य शिरल्याने तो वीरगीतांचा अवशेष होता. जुन्या ग्रंधाच्या शब्दशा भाषांतरापेक्षा प्राचीन सुतवर्ग
जे महाभारत गात त्यावरुन केलेला अभ्यास हा योग्य होईल असे त्याला वाटले. कौरव पांडवाच्या लढाईचा मुख्यभाग शोधणयाचा प्रयत्न केला.

भरतखंड  ः हिंदुस्थान हे, चीन, असुरिया, बाबिलोनया, पॅलेस्टाईन इजिप्त, या प्राचीन राष्टापैकी आहे. एतिहासिक काळ अजून निश्चित नसला तरी काही प्राचीन लेख, खोदलेख, इमारती, वाडमय याचे संशोधन होउन काळ निश्चिक होणे बाकी आहे. ख्रिस्तपूर्व निदान चार हजारवर्षे पासून मयादा समजण्यासा वाडमयाचा पुरावा आहे. हिंदुस्थानचे प्राचीन भूवर्णन काळात विभागले आहे. महाभारतकाल, वेदकाल, सिंकदरकाल, अशोककाल, कनिष्ककाल, गुप्तकाल, हूणकाल,हर्षकाल, चोलकाल,चव्हाणकाल,यादवकाल, विद्यारण्यकाल असे कालखंड आहेत. वेदकाळापूवी द्रविड व आर्य यांची वस्ती होती. रामरावण युद्ध त्यावेळचे होते. रामायणातील वर्णन वेदपूवकाळातील मान्यकरता येत नाही कारण नंतरही टप्याने त्याचे लेखन झाले आहे. देशाचे वणर्णन वेदकालीन ग्रंथातही त्रोटकच आहेत. भरतखंडाच्या वर्णनात देशातील नद्या, पर्वत, प्रदेशांची यादी आहे. भरतखंडात १५६ देश सांगितले तर ५० देश हिंदूस्थानात आहेत. उत्तरेकडील म्लच्छाशिवाय २६ देश सांगितले आहेत. कुरुक्षेत्राच्या दक्षिणेस शूरसेन देश. याची राजधानी मथुरा यमुना किना-यावर आहे. पश्चिमेस मत्स्यदेश (जयपूरजवळ० होता.कुंतीभोजाचादेश चर्मणवती नदीकाठी (ग्वाल्हेर). निषिधदेश (नलराजाचा देश) नरवारप्रांत शिंदेसरकाराच्या ताब्यात आहे तो. अवंती म्हणजे माळवा.,उज्जयनी, विदर्भ म्हणजे हल्लीचे व-हाड, राजधानी भोजकट होती. महाराष्ट्राचे नाव संबध महाभारतात कोठेच नाही. याचा अर्थ महाराष्ट त्यावेळी नव्हता असे नाही. मोठे स्वरुप आले नवह्ते. त्याचे लहान लहान भागांची नावे  महाभारतातील देशांच्या यादीत आली आहेत. रुपवाहित, अश्मक, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र या तीन राष्टांचे मिळून महाराष्ट्र पुढे बनले. यात मुळीच शंका नाही. भोजांचे जसे महाभोज झाले. तसे राष्ट्रांटे महाराष्टिक झाले. अश्मक हा देश देवपीरीच्या भोवतालच्या प्रदेशाला धरुनच होता. महाराष्ट्रातील लोकापैकी अश्मक हे मुख्य होते, गोपराष्ट्र हा नाशिकच्या भोवतालचा प्रदेश. पांडुराष्ट्रही त्याला जोडुन असावे. मल्लराष्ट्रहि एक भाग असावा. चारपाच लोकांचे राष्ट्र मिळून ते महाराष्ट्र म्हणून प्रसिद्धीस आले असावे. गुजरातचा महाभारतात उलेख नाही मात्र सौराष्ट्राचा आहे. दक्षिणेकडे जे देश सांगितले ते कोकण, मावळ. मालव म्हणजे घाटमाध्यावरील मावळे. दक्षिणेतील आणखी चोल, द्रविड, पांडुय, केरल, माहिषक हो होत. यांची नावे चोल -मद्रास, चोलमंडल-कोरोमंडल, तंजावर हे द्रविड होय, पाडुय तिनेवल्ली, केरल-त्रावणकोर, माहिष-म्हैसूर ही नावे ठरविता येतात. पश्चिमेकडील सिंधू-सिंधप्रांत, सौबीर, कच्छ हो देश होत.कच्छच्या उतरेला गांधार आहे. मध्य हिंदुस्थानात सतलजपासून गंगेच्यचा मुखापर्यंत येत. सुपीक व भरभराटीच्या प्रांतापैकी बहुतेक प्रांत येत. ह्युएनत्संगच्या वेळच्या ८० राज्यापैकी, ३७ राज्य यात होती. स्थानेश्वर, वैराट, मत्स्यदेश, श्रुन,मडावर, ब्रह्मपूर, अहिचछत्र, पिलोपेण, संकिसा, संकास्या, मथुरा, कनोज, अयुटो, उत्पलारण्य, हयमख प्रयाग, कौशांबी, कुशपूर, विशाखा, साकेत, अयोध्या, श्रावस्ता कपिली, कुशीनगर, वाराणशी, गजपतिपूर, वैशाली, वज्र, नेपाळ, मगध, हिरण्यपर्वत, चंपा, कांकजोल, पौड्रवर्धन, जझोटी, महेश्वरपूर, उज्जनी,माळवा, खेडा, आनंदपूर, वचडारी, इदर.
 पुर्वेकडे हिंदुस्थानात आसाम, बंगाल, संभळपूर, ओरिसा, गंजम, तापी व महानदी भागात कलिंग, राजमहेंद्री, कोसल, आंध्र, तेलगण, धनकट, कांचीपूर, कोकण.धनककट देशाचा परिसर १००० मैल. जोरिया- ४०० मैल, द्रविड-१००० मैल, कोकण,  मथुरा, परिसर ८३३ मैल, महाराष्ट्राच्या राजधानीपासून भडोचचे अंतर १६७ मैल होते. देशाचा घेर १००० मैलाचा होता.राज्यच्या पुवेला मोठा बुद्धविहार होता. सिलोन हे सातवया शतकात सिंहलदीप नावाने प्रसिद्ध होते. तेथून आलेले यात्रेकरु ह्युएन यास कांची येथे भेटले त्याच्यापासून सिलोनची माहिती मिळाली. घेर ११६७ मैल होता. उतर दक्षणि लांबी २७१ मैल व रुंदी १३७ मैल होती.


यादववंश (देवगिरीचा) -
महाराष्ट्रात यादव वंशाचें माहात्म्य अतिशय आहे. यादवांचेच वंशज जाधव होत. हे यादव मूळचे मथुरेचे राहणारे असून, त्यांचीं कित्येक घराणीं प्राचीन काळीं केव्हां तरी गुजराथेंत व महाराष्ट्रांत आलीं. हेमाद्रीच्या व्रतखंडांत ह्या घराण्याची हकीकत दिलेली आहे. यादवांचे दोन वंश प्रसिद्ध आहेत: एक नाशिकजवळ चंद्रादित्यपूर उर्फ चांदवड येथें राज्य करीत होता. दुसरा देवगिरी उर्फ दौलताबाद येथें होऊन गेला. पहिल्या वंशाची राजधानी श्रीनगर (सिन्नर) ही सेउण देशांत होती. सुबाहु नांवाचा एक पराक्रमी यादव राजा उत्तर हिंदुस्थानांत झाला. त्याचा मुलगा दृढप्रहार (सुमारें ७९५) ह्यानें प्रथम महाराष्ट्रांत प्रवेश करून आपलें राज्य स्थापिलें. दृढप्रहाराचा मुलगा सेउणचंद्र ह्यानें सेउणपूर शहर स्थापून देशांचेहि नांव सेउणदेश असें ठेविलें. हें खानदेशाचें मुसुलमान येण्याच्या पूर्वींचें नांव होय. देवगिरी शहर सेउणदेशाच्या उत्तर सरहद्दीवर होतें.

पहिल्या सेउणचंद्राच्या पश्चात त्याचा पुत्र धाडियप्पा व नातू भिल्लम (पहिला) हे अनुक्रमें गादीवर आले. पुढें राजगी, वादुगी, धाडियस, भिल्लम वगैरे राजे यादव कुळांत निपजले. हा भिल्लम (दुसरा) पराक्रमी होता. भिल्लमानंतर वेसुगी, अर्जुन व भिल्लम (तिसरा) हे राजे झाले. या भिल्लमानें चालुक्यवंशीय जयसिंहाच्या मुलीशीं लग्न लाविलें. त्यानंतर वादुगी दुसरा, वेसुगी दुसरा, भिल्लम चवथा व सेउणचंद्र दुसरा हे राजे झाले. त्यांत सेउणचंद्र दुसरा (१०६९) हा पराक्रमी राजा झाला. त्यानें चालुक्य राजाविक्रमादित्य यास पुष्कळ मदत केली. पुढें परम्मदेव सिंहराज उर्फ सिंघण, मलुगी अमरगागेय, गोविंदराज, बल्लाळ, अमर मलुगी आणि पांचवा भिल्लम हे राजे यादववंशांत निर्माण झाले. पांचव्या भिल्लमानें चालुक्यांचें राज्य जिंकलें. त्यापूर्वीं हे यादव चालुक्यांचे मांडलिक होते. याप्रमाणें दृढप्रहारापासून पांचव्या भिल्लमापर्यंत तेवीस राजांचीं नांवें आढळतात. सारांश यादवांच्या ह्या पहिल्या वंशानें ७९५ सालापासून ११९१ पर्यंत ३९६ वर्षें राज्य केलें.

पाचव्या भिल्लमाने सोमेश्वर चालुक्याचे मांडलिकत्व झुगारून दिले व द्वारसमुद्राच्या वीरबल्लाळ यादवाचा
पराभव करून देवगिरी येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली.(११८७-९१); देवगिरी शहर त्याने स्थापले.   भिल्लमाचा वंश महाराष्ट्रांत पुढें साम्राज्यसत्ताधारी झाला. भिल्लमाने आपणास प्रतापचक्रवर्ती व महाराजधिराज ही बिरुदे लावली. मुलगा जैतुगी उर्फ जैत्रपाळ पहिला (११९१-१२१०) पराक्रमी होता, याने ‘समस्त भुवनाश्रय महाराजाधिराज’ ही बिरुदे आपल्यास लाविली. त्याचा सेनापती शंकर    ब्राह्मण होता. प्रसिद्ध ज्योतिषी भास्कराचार्य याचा पुत्र लक्ष्मीधर हा जैत्रपाळाचा मुख्य पंडीत होता. जैत्रपाळास वेद, मीमांसा व तर्कशास्त्र यांचें चांगलें ज्ञान होते. प्रसिद्ध मराठी आद्यकवि मुकुंददराज हा याच्या पदरीं होता (कोणी म्हणतात कीं, मुकुंदराजाचा उल्लेखित जैत्रपाळ हा चांद्याच्या बाजूचा दुसरा कोणी जयपाळ असावा).

सिं घ ण (१२१०-१२४७).- हा पहिल्या जैत्रपाळाचा मुलगा. याच्या कारकीर्दींत यादवांची सत्ता अतोनात वाढत जाऊन त्यानें कुंतल देश काबीज करून माळवा, गुजराथ, चेदि देशांतील छत्तिसगड, इत्यादि ठिकाणच्या राजांस जिंकिलें. पद्मनाल (पन्हाळा) येथें शिलाहार भोज राज्य करीत होता. त्याचें राज्य सिंघणानें आपल्या राजांस जोडलें. कोल्हापूरच्या ताम्रलेखांत शिलाहारांचें नांव पुढें येत नसून यादवांचें येतें. सिंघणानें गुजराथवर अनेक स्वार्‍या केल्या. ह्या स्वार्‍यांत खोलेश्वर नांवाचा ब्राह्मण त्याचा सेनापति होता. गुजराथेंत ह्या वेळेस वाघेल वंशाचा अंमल होता. खोलेश्वरानें ह्या वाघेल राजांचा अनेक वेळां पाडाव केला. कीर्तिकौमुदीचा कर्ता सोमेश्वर यानें अनहिल पट्टणचे राजे वाघेल-चालुक्य व यादव ह्या राजांच्या युद्धांचें वर्णन दिलें आहे. वाघेलराज लवणप्रसाद व त्याचा मुलगा वीरधवल यांनीं सिंघणाशीं तह केला. दुसर्‍या स्वारींत खोलेश्वराचा मुलगा राम हा सेनापति होता. तो वीरधवलाचा मुलगा बीसलदेव याजबरोबर लढत असतां मारला गेला. त्याचा भाऊ बिज्जण, हा सिंघणाचा तिसरा सेनापति होय. यानें कोंकण व दक्षिण महाराष्ट्र देश जिंकले. त्या देशांचा कारभार तोच पहात असे. सातार्‍याच्या आसपास सिंघण हा मोठ्या सैन्यानिशीं पुष्कळ दिवस येऊन राहिला होता. सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांत मायणी गांवीं संगमेश्वर म्हणून शंकराचें देवालय आहे तें ह्यानें बांधिलें. ह्यानेंच भूषणगड किल्ला बांधून माण तालुक्यांतील शिखर सिंघणापूर गांव वसविलें. सिंघणापूरचा महादेव हा अनेक मराठा कुलांचा कुलदेव आहे. कोल्हापूरच्या भोज राजांशीं लढत असतां सिंघणापूरची छावणी सिंघणानें वसविली. दक्षिण प्रांतावर यादवांची भक्ति विशेष होती. सिंघण मोठा धार्मिक असून त्याला देवळें बांधण्याचा नाद फार होता. एकंदरींत सिंघण हा त्याकाळीं फार पराक्रमी राजा झाला. पृथ्वीवल्लभ, विष्णुवंशोद्भव इत्यादि विशेषणें त्यानें धारण केलीं होतीं. त्याचा ध्वज सुवर्णगरुडचिन्हांकित असे. यादवांच्या मुख्य मंत्र्यास श्रीकरणाधिप अशी संज्ञा होती. हा कारभार प्रथम सोधल नांवाच्या गृहस्थाकडे होता. सोधलाचा मुलगा शार्ङ्गधर; यानें संगीतरत्‍नाकर नांवाचा ग्रंथ सिंघणाच्या कारकीर्दीत लिहिला. भास्कराचार्याचा नातू (लक्ष्मीधराचा मुलगा) चांगदेव दरबाराचा मोठा ज्योतिषी होता. भास्कराचार्याचा भाऊ त्याचा मुलगा गणपती, त्याचा मुलगा अनंतदेव; हा मोठा ज्योतिषी या दरबारांत होता. भास्कराच्या घराण्यास यादव राजांचा उत्कृष्ट आश्रय होता. सिंघणाचा पराक्रमी व विद्वान मुलगा जैत्रपाळ दुसरा, हा बापाच्या मरण पावला होता. सिंघणानंतर त्याचा नातू हा राजा झाला.

हाहि पराक्रमी होता. या स्वार्‍या केल्या आणि पुष्कळ यज्ञ केले. याचा मंत्री लक्ष्मीदेव म्हणून होता, त्याच्या नंतर जल्हण हा मंत्री झाला. हा फार विद्वान होता. याच्या वेळीं संस्कृत विद्येची भरभराट होती.

म हा दे व (१२६०-७१).-हा कृष्णाचा धाकटा भाऊ. यानेंहि तैलंगण, गुजराथ व कोंकणांत स्वार्‍या केल्या. यानें ठाणें येथील सोमेश्वर शिलाहार राजास मारून उत्तरकोंकण आपल्या राज्यास जोडलें. यावेळची लढाई दर्यावर झाली. तींत सोमेश्वराचीं बहुतेक गलबतें बुडालीं. महादेवानें आपणास “चक्रवर्तीं” म्हणविलें. हेमाडपंत हा महादेवाच्या कारकीर्दींत यादव साम्राज्याचा श्रीकरणाधिप झाला.


रा म दे व (१२७१-१३०९).-हा कृष्णाचा मुलगा. याची कीर्ति फार मोठी आहे. याच्या व याच्या पूर्वजांच्या कारकीर्दींत ब्राह्मण सुभेदार, सेनापति व मंत्री बरेच झाले. कृष्ण व अच्युत नांवाचे दोन सुभेदार याच्या वेळीं कोंकण व दख्खन या भागांवर होते. रामचंद्र उर्फ रामदेवराजानें एकदां ५७ ब्राह्मणांस तीन गांवें इनाम दिलीं होतीं (१२७१). त्यांत पुढील शर्ती होत्या:-या ब्राह्मणांनीं व त्यांच्या वंशजांनीं तीं गांवें सोडूं नयेत व गहाण टाकूं नयेत. गांवांत वेश्या राहूं देऊं नये, जुवा खेळूं नये, हत्यारें वापरूं नयेत व सत्कर्मांत वेळ घालवावा. यावरून रामदेवाची सन्मार्गप्रवृत्ति दिसून येते. महाराष्ट्रांतील शेवटचा वैभवशाली सम्राट हा रामदेवरायच होता. पुढें अल्लाउद्दीन खिलजीनें देवगिरीस २५ दिवस वेढा घालून रामदेवरायाचा पराभव करून त्याला आपलें अंकित बनविलें (५ फेब्रुवारी १२९४). अल्लाउद्दीनानें अपार संपत्ति घेऊन दिल्लीस प्रयाण केलें. (अल्लाउद्दीन पहा). पुढें रामदेवराव ठरलेली खंडणी देईना म्हणून मलीक काफरनें पुन्हां त्याच्यावर स्वारी करून त्यास पकडून दिल्लीस नेलें; तेथून ६ महिन्यांनीं परत आल्यावर मात्र तो नियमितपणें दिल्लीस खंडणी पाठवीत असे. नंतर तो २ वर्षांनीं मरण पावला (१३०९). भागवतधर्मा (वारकरीपंथा) चा प्रसार याच्या वेळीं ज्ञानदेव, नामदेव वगैरे संतांनीं केला. ज्ञानेश्वरींत रामदेवास ‘सकलकलानिवास, न्यायानें क्षिति पोसणारा’ अशीं विशेषणें ज्ञानेश्वरानें दिलीं आहेत. मात्र मुसुलमानांपासून त्याला आपल्या साम्राज्याचें रक्षण करतां आलें नाहीं, यावरून तो तितका शूर व दूरदर्शी नसावा असें दिसतें. हेमाडपंथ हा यांचाहि मंत्री होता. त्याच्या राजप्रशस्ति नांवाच्या यादववंशाचा इतिहास आलेला आहे.

शं क र दे व (१३०९-१२).-हा रामदेवरायाचा पुत्र. यानें मुसुलमानांविरुद्ध उचल करून दिल्लीस खंडणी पाठविण्याचें बंद केलें. परंतु इतर हिंदु राजांनीं मदत न केल्यानें हा एकटा पडला. शेवटीं मलीक काफरचें याच्यावर स्वारी करून याला ठार केलें व यादवांचें राज्य खालसा केलें. पुढें अल्लाउद्दीन मेल्यावर दिल्लीस बादशाही जी बंडाळी झाली तिचा फायदा घेऊन रामदेवाचा जावई हरपाळदेव यानें मुसुलमान सुभेदार हांकलून देऊन देवगिरी आपल्या ताब्यांत घेतली. पण मुबारक खिलजीनें स्वत: देवगिरीस येऊन हरपाळाचा पराभव करून त्याचा वध केला. या वेळेपासून महाराष्ट्रांत मुसुलमानांचें राज्य सुरू झालें. [ भांडारकर-हिस्टरी ऑफ दि डेक्कन; राजप्रशस्ति; स्मिथ-अर्लि हिस्टरी ऑफ इंडिया ].